भारतात डिजिटल क्रांती होण्याच्या फार वर्षे आधी जेव्हा प्रकाशीय धाग्यांची संकल्पनाही निर्मितीच्या अवस्थेत होती तेव्हा काही भारतीयांचा त्याबाबतच्या संशोधनात सहभाग होता. त्यांपैकी एक म्हणजे डॉ. निरदर सिंग कपानी. प्रकाशीय धागे तंत्रज्ञानाचे  पितामह अशीच त्यांची ओळख.  शांघायमध्ये जन्मलेले वैज्ञानिक चार्लस क्यएन काओ यांना या तंत्रज्ञानासाठी २००९ मध्ये नोबेल मिळाले होते त्यावेळी कपानी यांना मात्र डावलण्यात आले. या कपानी यांचे अमेरिकेत कॅलिफोर्नियातील वुडसाइड येथे नुकतेच निधन झाले. १९५३ मध्ये लंडनमधील नामांकित इम्पीरियल कॉलेजमध्ये त्यांनी हॅरॉल्ड हॉपकिन्स यांच्या समवेत काम केले होते. प्रकाशीय धाग्यांमुळे संदेशवहनात मोठी प्रगती झाली, त्यात या दोघांचा मोठा वाटा होता. ‘प्रकाशीय धागे’ (फायबर ऑप्टिक्स) हा शब्द व संकल्पना कपानी यांनीच प्रथम १९६० मध्ये सायंटिफिक अमेरिकनमधील शोधनिबंधात वापरली होती. काचेच्या धाग्यात प्रकाश एका दिशेने सोडला तर तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो त्यामुळे प्रकाशीय धाग्यांचा वापर संदेशवहनासाठी होऊ शकतो ही ती मूळ संकल्पना. इंटरनेट युगाची पायाभरणी करण्यात कपानी यांचा या तंत्रज्ञानाच्या रूपाने मोठा वाटा होता. कपानी यांचा जन्म पंजाबमधील मोगात ३१ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. डेहराडून येथे त्यांचे बालपण गेले. आग्रा विद्यापीठातून १९४८ मध्ये पदवी घेऊन पीएचडीसाठी ते लंडनला गेले. तेथूनच अमेरिकेला स्थायिक होऊन, रॉचेस्टर विद्यापीठात व नंतर शिकागोतील इलिनॉइस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थांत संशोधन केले. वुडसाइड येथे कपानी यांनी ऑप्टिक्स टेक्नॉलॉजी ही कंपनी स्थापन केली होती. १९७३ मध्ये त्यांनी कॅपट्रॉन कंपनीची स्थापना केली. १९९९ मध्ये त्यांना ‘फॉर्च्युन’ नियतकालिकाने सात उद्योजकांत गौरवले होते. प्रकाशीय धागे व उद्योजकता या विषयावर चार पुस्तकेही त्यांनी लिहिली. फायबर ऑप्टिक्स, लेसर्स, सौरऊर्जा यावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. जैव वैद्यकीय साधने, संरक्षण उपकरणे, दूरसंचार उपकरणे, प्रदूषण मापन उपकरणे यात त्यांनी १०० एकस्वे (पेटंट) घेतली. कॅलिफोर्निया विद्यापीठात सांता क्रूझ येथे उद्योजकता नवनिर्माण केंद्राची स्थापना त्यांनी केली. याच विद्यापीठाच्या बर्कले कॅम्पसमध्ये ते काही काळ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे प्रकाशीय विजाणुशास्त्राचे मानद प्राध्यापक होते.दानशूरता हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़. त्यांनी शीख संस्कृती व भाषा विकासासाठी आर्थिक मदत केली. १९६७ मध्ये शीख फाउंडेशनची स्थापना केली. कपानी यांच्या आठवणी ‘द मॅन हू बेंट लाइट’ या नावाने २०२१ मध्ये प्रकाशित होणार आहेत. त्यांच्या निधनाने एका कलासक्त वैज्ञानिकाला आपण मुकलो आहोत.

Shani Margi 2024
Shani Margi 2024 : शनि कुंभ राशीमध्ये मार्गी! ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार धन अन् पैसा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Japanese man celebrates sixth marriage anniversary
मुलींचे नकार पचवून वैतागल्याने शेवटी ‘बाहुली’शी केलं लग्न! अजब प्रेमाची गजब कहाणी; पाहा VIDEO
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी