भारताचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीर याने जाहीर केलेली निवृत्ती ही बहुसंख्य क्रिकेटरसिकांसाठी एक बातमीच होती. कारण त्यांच्या दृष्टीने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दिसेनासा म्हणजे निवृत्तच झाला होता. गौतम अजूनही दिल्लीकडून एक रणजी सामना खेळणार आहे. तो त्याचा शेवटचा क्रिकेट सामना ठरेल. स्थानिक क्रिकेटविषयी सार्वत्रिक अनास्था असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एखादा खेळाडू निवृत्त झाला म्हणजे त्याला समृद्ध अडगळ ठरवून टाकण्याचा हा जमाना आहे. गौतम त्या मानसिकतेचा नाही. त्याच्या लेखी स्थानिक क्रिकेटलाही तितकेच महत्त्व असल्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीचा शेवट कदाचित झगमगाटात होणारही नाही. गौतम गंभीरला या गोष्टींची फिकीर नसते. फिकीर करण्याचा स्वभाव असता, तर तो कदाचित अधिक प्रदीर्घ काळ खेळून अधिक यशस्वी क्रिकेटपटू बनू शकला असता. ‘गौतम तू संपलास’ असे अंतर्मनाने आपल्याला सांगितल्याची प्रांजळ कबुली देणारा असा क्रिकेटपटू विरळा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा