तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र व विज्ञान अशा अगदी वेगळ्या शाखांमध्ये एकाच वेळी पारंगत असणे ही तशी दुर्लभ गोष्ट, पण गोव्याचे खगोल वैज्ञानिक रिचर्ड डिसूझा यांच्याकडे ती आहे! अलीकडेच मिशिगन विद्यापीठाच्या दोन संशोधकांनी असा शोध लावला की, आपल्या आकाशगंगेला एक भावंड होते. ती एक दीर्घिकाच होती, पण तिला शेजारच्या अँड्रोमीडा म्हणजे देवयानी या दीर्घिकेने २ अब्ज वर्षांपूर्वी गिळले. या संशोधनात रिचर्ड डिसूझा यांचा मोठा वाटा आहे. हा शोधनिबंध नुकताच ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. दीर्घिका, त्यांचा जन्म, गुरुत्वीय बलाने होणारी ओढाताण, एकमेकांशी टकरी असा सगळा प्रवास या शोधनिबंधात मांडला आहे. देवयानीने इतर अनेक लहान दीर्घिका गिळल्या आहेत. संगणक सादृशीकरणाच्या माध्यमातून डिसूझा यांनी ती गिळली गेल्याचे स्पष्ट केले. जी दीर्घिका (गॅलॅक्सी) देवयानीने गिळली तिचे नाव ‘एम ३२ पी’. या शोधाला वेगळा अर्थही आहे, तो म्हणजे जेव्हा दोन दीर्घिकांची टक्कर होते तेव्हा त्याचा उरलेल्या दीर्घिकांच्या रचनेवर परिणाम होतो तसा तो आपल्या आकाशगंगेवर झाला असावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा