दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारच्या अत्यंत वादग्रस्त अशा नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे मोजके अर्थतज्ज्ञ देशात होते. कृष्णमूर्ती सुब्रमणियन त्यांपैकीच एक. परंतु केवळ तेवढय़ा एका भांडवलावर सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदावर आपली नियुक्ती झालेली नाही हे सुनिश्चित करण्याची प्रमुख जबाबदारी सुब्रमणियन यांच्यावर राहील. त्यांचे पूर्वसुरी अरविंद सुब्रमणियन यांनी जुलै महिन्यात पदत्याग केला, तेव्हा एकूणच या सरकारला जरा निराळे आणि सावध सल्ले देणारी सल्लागार मंडळी फारशी झेपत नाहीत, अशी चर्चा सुरू झाली होती. कारण ऊर्जित पटेल यांच्या आधीचे रिझव्‍‌र्ह बँकेचे  गव्हर्नर रघुराम राजन यांनाही मुदतवाढ मिळू शकली नव्हती. ४७ वर्षीय सुब्रमणियन हे आजवरच्या सर्वात युवा आर्थिक सल्लागारांपैकी एक ठरतात. सध्या ते हैदराबाद येथील प्रतिष्ठित इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अ‍ॅनॅलिटिकल फायनान्स विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांची उच्च शैक्षणिक कारकीर्द आदर्शवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयआयटी कानपूर येथून पदवी, मग आयआयएम कोलकाता येथून पदव्युत्तर पदवी. त्यानंतर अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए आणि पीएचडी. पीएचडीसाठी त्यांचे एक मार्गदर्शक होते डॉ. रघुराम राजन!  शिकागोत शिकून झाल्यानंतर इतर बहुतेक सहाध्यायींप्रमाणे अमेरिका किंवा इतर पाश्चिमात्य देशांमध्ये वास्तव्य आणि अध्यापन न करता, सुब्रमणियन भारतात आले हे त्यांचे एक वैशिष्टय़ मानावे लागेल. भारतात रिझव्‍‌र्ह बँक, सेबी अशा अनेक संस्थांशी ते संबंधित आहेत. वृत्तपत्र लेखन, माध्यम चर्चामध्ये सातत्याने ते सहभागी होताना दिसतात. अशाच एका लेखात त्यांनी नोटाबंदीचे समर्थन केले होते. नोटाबंदीमुळे आर्थिक उतरंडीच्या वरच्या पायऱ्यांवरील नागरिकांना त्रास झाला असेल. पण गरिबांना याची झळ पोहोचली नाही असे त्यांचे निरीक्षण होते. २०१६मधील केंद्रीय अर्थसंकल्पाचे वर्णन त्यांनी ग्रामीण भारतासाठी क्रांतिकारी अशा शब्दांत केले होते. स्वतचे मत बेधडकपणे व्यक्त करणारे असा त्यांचा लौकिक आहे. मात्र आता सरकारचे सल्लागार या पदावर काम करताना निव्वळ विश्लेषणापलीकडे जाऊन नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. बँकिंग हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय असल्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेबरोबर सध्या सरकारतर्फे सुरू असलेला सुप्त संघर्ष हाताबाहेर जाणार नाही हे पाहावे लागेल. निवडणूक वर्षांत सरकारचे राजकीय प्राधान्य आणि आर्थिक शहाणपण यांच्यातील सुवर्णमध्य शोधावा लागेल. कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांच्यापुढील आव्हाने अशी व्यामिश्र आहेत.