हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईच्या ‘सर ज. जी. कला महाविद्यालया’त १९४० च्या दशकात शिकलेल्या व पुढे पॅरिसच्या ‘इकोल द ब्यो आर्ट’मध्ये शिकण्याची संधी घेऊन मातृभूमीत परतलेल्या बहुतेक साऱ्या चित्रकारांचा सुवर्णकाळ १९७० ते १९८० या दशकापर्यंतच सीमित असल्याचे दिसते. लक्ष्मण पै हेदेखील त्यास अपवाद नव्हते. आंतरराष्ट्रीय कलाबाजारात त्यांची चित्रे महत्त्वाची मानली जाताहेत हे खरेच, पण ती सारी चित्रे १९५०, १९६० च्या दशकातील आहेत, हे अधिक खरे. बहुधा त्यामुळेच,लक्ष्मण पै यांची १४ मार्चच्या रात्री आलेली निधनवार्ता फार कमी जाणकारांना हलवून गेली. अर्थात गोव्यामध्ये ती मोठीच बातमी होती, कारण तेथील गोवा कला महाविद्यालयात १९७७ ते ८७ या काळात त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज प्रथितयश चित्रकार आहेत.
लक्ष्मण पै यांचा जन्म मडगावातला, २१ जानेवारी १९२६ चा. वयाच्या अठराव्या वर्षी ते मुंबईत आले आणि ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’ उदयाला येण्याआधीच ‘जेजे आर्टस्कुला’तून प्रतिष्ठेचे मानले जाणारे मेयो सुवर्णपदक मिळवून तेथेच शिकवू लागले. तेव्हा शंकर पळशीकर, जगन्नाथ अहिवासी हेही तेथे शिकवत होते आणि रसिक रावल शिकत होते. गोव्याचेच फ्रान्सिस न्यूटन सूझा हे पैंपेक्षा एखाद वर्ष पुढे होते. अशा वातावरणात शिकताना पै यांचा ओढा अहिवासींच्या काटेकोर रचना आणि सूझांच्या बेफाम मुक्त रेषा यांच्या मध्ये असलेल्या पळशीकर, शिवाक्ष चावडा आदींच्या शैलींकडे अधिक असल्याचे दिसते. यात पॅरिसच्या मुक्कामापत (१९५१ ते ६१) महत्त्वाचा फरक पडला. लघुचित्रांप्रमाणे, सपाट चित्रप्रतलावर त्रिमितीची रचना असेच जरी पैंच्या चित्रांचे स्वरूप असले तरी त्यात रचनेचे अनेक प्रयोग होऊ लागले. ‘कपल’ नावाच्या ५१ सालच्या चित्रात पुरुषाचा पाय पुढे असल्याने देऊळ मागे असल्याचे निश्चित होते आणि त्या देवळाच्या बरेच आतमध्ये शिवलिंग आहे, हे काळसर छटांमुळे सिद्ध होते. जसजशी वर्षे सरत गेली, तसतसा चित्रप्रतलातला हा त्रिमित खेळ कमी-कमी होऊ लागला. त्याउलट, फुलाच्या प्रत्येक पाकळीत पिवळा व लाल रंग पेरून प्रत्येक पाकळी त्रिमितच असल्याचे दाखवण्याचा आग्रह दिसू लागला. अर्थात, ही नंतरची चित्रेही प्रतलाच्या सपाटीला महत्त्व देणारीच आहेत. त्यांचे विषय मात्र आधीच्या अभिजात (ऋ तुसंहार, गीतगोविन्द, राग मालिका इ.) विषयांऐवजी ‘फ्लॉवर्स’ वगैरे असू लागले. १९६२ ला ‘ललित कला अकादमी’चा पुरस्कार मिळवणाऱ्या पै यांना १९८५ मध्ये पद्माश्री आणि २०१८ मध्ये पद्माभूषणने गौरवण्यात आले.