श्रीमंतांच्या, सरकारी उच्चपदस्थांच्या मुलांना पैशाने हवे ते शिक्षण मिळू शकते; छंद वाढवण्यासाठी घरून किती तरी मदत होते, कशालाच पैसा कमी पडत नाही, ‘मी अमुक-अमुक होणार’ असे लहानपणीच श्रीमंतांच्या मुलांनी ठरवावे आणि त्यांच्या बडय़ा पालकांनी ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी आणखी पैसा खर्चावा, हेही नेहमीचेच.. मारिओ मोलिना यांचे बालपण, अगदी श्रीमंतीच होते. तरीही त्यांच्या निधनाची दखल जगाने तातडीने घेतली, ती रसायनशास्त्रात महत्त्वाचे संशोधन करणारे ‘नोबेल’ मानकरी म्हणून! सुखी बालपणातही रसायनशास्त्राची आवड तळमळीनेच जपणारे आणि ‘रसायनशास्त्र संशोधकच व्हायचे’ असा निश्चय वयाच्या ११व्या वर्षी (सन १९५४) करणारे मारिओ मोलिना मात्र १९९५ मध्ये ‘नोबेल’ मानकरी ठरले. त्या वर्षीचे नोबेल तिघांना विभागून देण्यात आले होते आणि १९७० मध्ये बीजरूपात मांडल्या गेलेल्या सिद्धांतावर पुढील संशोधन त्यांनी १९७५ मध्ये केले होते. हे संशोधन आजही उपयुक्त ठरते, कारण ते होते ‘ओझोन थरा’ला विरळ करणाऱ्या वा छिद्र पाडणाऱ्या ‘क्लोरोफ्लूरोकार्बन्स’ (सीएफसी) वरील पहिले निर्णायक संशोधन.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा