मध्य प्रदेशातील एका गावात जन्मलेली माया विश्वकर्मा ही लोहारकाम करणाऱ्या गरीब बापाची कन्या. सुरुवातीला पाळी आली तेव्हा तिला दुसऱ्याच एका महिलेने वापरलेला कपडा देण्यात आला, त्यामुळे तिला संसर्ग झाला. वयाच्या सव्विसाव्या वर्षांपर्यंत तिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅड वापरण्याची वेळ आली नाही, तिला त्याबाबत माहितीही नव्हते, त्यासाठी पैसाही नव्हता. पुढे पदव्युत्तर पदवी घेऊन नंतर तिने दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात संशोधन सुरू केले. त्या वेळीही मासिक पाळीतील आरोग्याची असुरक्षितता तिला जाणवली होती. नंतर ती अमेरिकेला गेली, तेथे कर्करोग जीवशास्त्रज्ञ बनली, पण सामान्य आयाबहिणींच्या जीवनात भेडसावणारा हा छोटासा प्रश्न कर्करोगावरील संशोधनात गढून जातानाही ती विसरली नव्हती. अमेरिकेतून आलेली माया पॅडवुमन म्हणून मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्य़ात काम करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा