निधन ही दु:खद बाब. त्यात मॉर्ट ड्रकर हे न्यू यॉर्कजवळील त्यांच्या राहत्या घरी, वयाच्या ९१ व्या वर्षी, श्वसनाचा त्रास आणि अंगदुखीनं गेले.. करोना विषाणूचा संसर्ग होता की नव्हता, याची चाचणीच झाली नव्हती. हे अधिक दु:खद. मग इथे या मजकुरासोबत त्यांचे हे व्यंगचित्रसदृश  चित्र कशाला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ते चित्र पुन्हा पाहा.. गाल आणि नाक नक्की पाहा, चेहऱ्याला जी तुकतुकी देण्यात आली आहे तीही पाहणे चुकवू नका.. कदाचित, कधीतरी पाहिलेल्या ‘मॅड’ या व्यंगचित्र-नियतकालिकातील  चित्रांची आठवण जागी होईल.. होय, ती चित्रे याच मॉर्ट ड्रकर यांची. १९५६ पासून पुढली ५५ वर्षे – म्हणजे २०११ पर्यंत ते ‘मॅड’साठी काम करीत होते. त्यांच्या काळात मॅडचा ‘आल्फ्रेड न्यूमन’ या काल्पनिक नावाचा तो जगप्रसिद्ध तरुण मुलगा अधिक गोबऱ्या गालांचा, तुकतुकीत कांतीचा आणि नकटा असला तरी लक्षणीय नाकाचा दिसू लागला (त्या पात्राची मूळ निर्मिती ड्रकर यांची नव्हे, पण त्यांच्या शैलीचा प्रभाव त्यावर पडला). ज्या काळात नॉर्मन रॉकवेल यांच्या बोधचित्रांतून – म्हणजे इलस्ट्रेशनमधून- आनंदी, समृद्ध अमेरिकेचे दर्शन होत होते त्या काळात ड्रकर यांनी रॉकवेल यांच्या शुद्ध-सात्त्विक शैलीचीच जणू खिल्ली उडवणारी अर्कचित्रे काढणे सुरू केले. मग गोऱ्या चेहऱ्यांवरले वांग ठळक झाले, नाक/ कान/ हनुवटी आदींमधले निराळेपण व्यंगचित्रकाराच्या नजरेने हेरले गेले.. पण तरीही रॉकवेल यांच्या चित्रांमधला प्रसन्नपणा ड्रकर यांच्या अर्कचित्रांतही उतरला (रॉकवेल यांनी व्यंगचित्र आणि बोधचित्र यांसाठी दोन निरनिराळय़ा पद्धती वापरल्या, तसे काही ड्रकर यांना करावेच लागले नाही)!

मॉर्ट ड्रकर हे १९२९ सालच्या कोणत्या तारखेस जन्मले, आईवडिलांची नावे/ व्यवसाय काय होते, वगैरेपासून सारे चरित्र-तपशील आता अमेरिकी माध्यमांतून ढिगाने दिले जाताहेत. पण आपणा मराठीभाषक चाहत्यांसाठी महत्त्वाचे हे की, आपल्या ‘आवाज’ आदी वार्षिकांत त्या-त्या वर्षी गाजलेल्या एखाद्या चित्रपटावरील व्यंगचित्रमाला असायची; त्या कल्पनेचे मूळ ‘मॅड’साठी या मॉर्ट ड्रकर यांनी केलेल्या कामात आहे! १९६० च्या दशकापासून, तेव्हाच्या अमेरिकी चित्रवाणीवर गाजणाऱ्या मालिका वा हॉलिवूडचे चित्रपट यांना खटय़ाळ विनोदाची फोडणी देऊन ड्रकर यांची व्यंगचित्रमाला दरमहा वाचकभेटीस येत असे. प्रेक्षकांना हमखास आवडणाऱ्या व निर्माता/ दिग्दर्शकांनी हुकमीपणे घातलेल्या/ रंगवलेल्या कित्येक प्रसंगांचे विनोदी मूर्तिभंजनच मॉर्ट ड्रकर यांच्या या व्यंगचित्रमालांतून होई. शिवाय, प्रसन्न शैलीमुळे कुणाही व्यक्तीचा दुस्वास करणारी त्यांची चित्रे नसत. उलट, अमेरिकी चित्रवाणी व चित्रपटांतील अनेक गाजलेल्या चेहऱ्यांना मॉर्ट ड्रकर यांनी दिलेले रूप अर्कचित्रासारखे असूनही लोभस वाटे. राजकीय  अर्कचित्रेही त्यांनी केली, त्यांपैकी एक गेल्या दशकात गाजले आणि जगभर प्रसृत झाले, ते होते लांब कान- आडवे ओठ आणि चौकोनी हनुवटी असलेल्या बराक ओबामांचे!

अमेरिकेच्या ‘नॅशनल कार्टूनिस्ट्स सोसायटी’ या संस्थेचे पुरस्कार १९८५ ते १९८८ अशी सलग चार वर्षे मिळवणाऱ्या ड्रकर यांना २०१४-१५ साली या संस्थेने सुरू केलेले ‘मेडल ऑफ ऑनर’ हे कारकीर्द गौरव-पदक मिळाले. या पदकाचे ते पहिले मानकरी. आताच्या फोटोशॉप आदींच्या काळात आणि एखादे अ‍ॅप वापरून कुणीही स्वत:चे अर्कचित्र बनवू शकत असताना कदाचित ड्रकर यांच्या कामाची मातब्बरी वाटणार नाही, पण हे काम मानवी बुद्धी व हात यांच्या करामतीचे होते!