ठाण्यातील अॅड. शरद भाटे हे प्रसिद्ध करसल्लागार. टोकाचे स्पष्टवक्ते, कडक शिस्तीचे आणि तितकेच प्रामाणिक. भाटेंचे वडील शिक्षक होते. १२ भावंडं. घरची परिस्थिती बेताचीच, ती लक्षात घेऊन त्यांनी १६-१७ व्या वर्षापासूनच छोटी-मोठी कामं करत घरात हातभार लावायला सुरूवात केली. भाटेंनी सुरुवातीला ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरी करत असतानाच पार्टटाइम अकाऊंट्सची कामे केली. पुढे वकिली पूर्ण केली आणि कर या विषयात गती प्राप्त केली. पुढे ते स्वत:ची ओळख ‘टॅक्स अॅडव्होकेट’ अशीच करून देत. अनेक कर सल्लागार त्यांची मदत घेत. पुढे बँके तली नोकरी सोडून कर सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना प्रचंड यश मिळाले. ठाण्यातील त्यांच्या अशिलांसाठी त्यांनी अनेक अभिनव योजना राबविल्या. अर्थसंकल्प सादर झाला की भाटे त्यातील करसंबंधी तरतुदींवर एक मोठे परिपत्रक काढीत. ते त्यांच्या सर्व अशिलांना आणि हितचिंतकांना स्वखर्चाने पोस्टाने पाठवत. हे परिपत्रक इतके परिपूर्ण असे की करसंबंधी बाकी कुठल्याही संदर्भांची गरज भासत नसे. भाटेंचा विशेष म्हणजे कर सल्ल्याचे काम सचोटीने करता येते हे त्यांनी दाखवून दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा