आपला आहारविहार आपल्या जीवनाची गाडी रुळावर ठेवत असतो; पण वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यावर आपण कृषी-तंत्रज्ञानाने मात केली असली तरी त्यामुळेच कीटकनाशकांचा वापर वाढून कर्करोगात वाढ झाली, आपण जे अन्न खातो त्याला कसदारपणा राहिला नाही, अशा आव्हानात्मक परिस्थितीत अन्न संशोधनासाठी काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे केंद्रीय सागरी मच्छीमारी संशोधन संस्थेतील मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती! त्यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार नुकताच जाहीर झाला. सागरी शैवालापासून त्यांनी विविध जीवनशैलीजन्य रोगांवर उपचार ठरू शकतील अशा औषधी पोषक उत्पादनांची निर्मिती केली. पाच वर्षांतून एकदा दिला जाणारा हा पुरस्कार १० लाख रुपयांचा आहे. या शिवाय हा पुरस्कार मिळालेल्या वैज्ञानिकास पुढील पाच वर्षांच्या संशोधनासाठी १.५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते त्यावरून या पुरस्काराचे महत्त्व लक्षात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा