एचआयव्ही या विषाणूच्या शोधाचे जनक आणि नोबेल विजेते फ्रेंच विषाणुतज्ज्ञ डॉ. ल्यूक मॉटान्ये (Luc Montagnier) यांचे विषाणुविज्ञान क्षेत्रातील कार्य अनमोल आहे. त्यांचे वयाच्या ८९व्या वर्षी, नुकतेच पॅरिसमध्ये निधन झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एचआयव्ही विषाणूच्या शोधाचा प्रवास पॅरिसमध्ये १९८२ साली सुरू झाला. पॅरिसमधील डॉ. विली रोझेनबॅम यांना त्यांच्याकडे येणाऱ्या काही रुग्णांमध्ये आढळलेल्या नव्या आजारामागची कारणे शोधायची होती. त्या वेळी एचआयव्ही हे नाव प्रचलित नव्हते. त्या काळी या आजाराला गे रिलेटेड इम्युन डिफिशिएन्सी असे ओळखले जात होते. तेव्हा आजाराच्या निदानासाठी कोणत्याही चाचण्या उपलब्ध नव्हत्या, इतकेच नव्हे तर ठोस उपचारही नव्हते. लक्षणांवरून हा आजार रेट्राव्हायरस या विषाणूंमुळे होत असल्याची शक्यता व्यक्त करत डॉ. रोझेनबॅम यांनी या विषयातले तज्ज्ञ डॉ. मॉटान्ये यांना याचा अभ्यास करण्याची विनंती केली. डॉ. मॉटान्ये हे त्या वेळी पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिटय़ूटमध्ये व्हायरल ऑन्कॉलॉजी विभागात कार्यरत होते.
डॉ. मॉटान्ये यांनी एका नमुन्याची तपासणी केली. त्यात आढळलेले विषाणू याआधी आढळलेल्या रेट्राव्हायरसपेक्षा वेगळे असल्याचे आढळले. त्यांना याला लिम्फनोपॅथी असोसिएटेड व्हायरस (एलएव्ही) असे नाव दिले. पुढे याच विषयात डॉ. मॉटान्ये यांच्यासोबत संशोधन करणाऱ्या डॉ. फरानस्वास बागे सिनोसी यांनी २० मे १०९३ रोजी एलएव्ही या विषाणूमुळे एचआयव्हीची बाधा होते असे मांडले. डॉ. मॉटान्ये आणि डॉ. सिनोसी यांच्या संशोधनाची दखल घेत २००८ साली त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले गेले. १९८६ मध्ये, एचआयव्हीची बाधा होण्यास कारणीभूत असलेल्या विषाणूला, अमेरिकमध्ये एचटीएलव्ही-थ्री ( HTLV- III)) आणि फ्रान्समध्ये एलएव्ही या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे या विषाणूला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) हे नाव देण्यात आले.
डॉ. मॉटान्ये यांचा जन्म पॅरिसमधील चॅम्ब्रिस येथे १८ ऑगस्ट १९३२ साली झाला. त्यांचे वडील लेखापाल तर आई गृहिणी होती. त्यांनी त्यांच्या गॅरेजमध्येच एक तात्पुरती प्रयोगशाळा उभारली होती. एचआयव्हीच्या संशोधनानंतर त्यांनी इतरही अनेक प्रयोग केले. आपल्या पेशीतील सर्व जैविक, जैवरासायनिक आणि रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करणारा रेणू म्हणजे ‘डीएनए.’ हा डीएनए विद्युत चुंबकीय किरणे उत्सर्जित करत असल्याचा दावा त्यांनी एका अभ्यासामध्ये केला होता. संसर्ग बरा झाला तरी काही जिवाणूंचे डीएनए हे विशिष्ट संकेत देत असतात असेही त्यांनी त्यात मांडले होते. विषाणू विज्ञानशास्त्राबाबतच्या त्यांच्या भूमिकेमुळे ते नेहमीच वादात राहिले होते. आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटीचे अध्यक्ष मार्क वेनबर्ग यांनी डॉ. मॉटान्ये यांना नोबेल मिळाल्यावर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘वस्तुस्थिती अशी आहे की त्याच्या वैज्ञानिक कल्पना त्याच्या समवयस्कांनी विश्वासार्ह मानल्या नाहीत किंवा त्या काळाच्या कसोटीवर उतरल्या नाहीत,’ असा खेद व्यक्त केला होता.