सध्याच्या काळात शेतमालातील सदोषतेने माणसाला कर्करोगासह निरनिराळे रोग होतात यावर बरीच चर्चा सुरू आहे.  या परिस्थितीतही एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे आपल्या अन्नाची म्हणजे अगदी फळे, भाज्या, अन्नधान्य यांची जी चव होती ती कुठे तरी गमावली आहे. याचे कारण संकरित बियाणे हे आहे. या बियाणांचे काही फायदे आहेत ते नाकारून चालणार नाही, पण आधीच्या बियाणांची साठवणही त्यात महत्त्वाची आहे. जैवविविधतेसाठी आदिवासी भागांमध्ये काही लोक असे बियाणे जतन करून ठेवतात. राहीबाई पोपेरे यांचे या क्षेत्रातील काम अजोड म्हणावे लागेल. त्यांचा  बीबीसीने जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये समावेश केला आहे. एरवी अशा कामाची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणे तसे दुरापास्त पण राहीबाईंना हा सन्मान मिळाला आहे.

यंदाचे वर्ष जागतिक स्त्री हक्क वर्ष असल्याने त्याचे औचित्य साधून बीबीसीकडून राहीबाईंसह इतर महिलांसमवेत गौरव करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड, पेरूमधील लेखिका इजाबेल अलेंद, क्लिंटन फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा चेलसा क्लिंटन आदी ६० देशांतील लेखक, पत्रकार, कलावंत आदींमध्ये राहीबाईंचा दिमाखात समावेश आहे. देशी बियाणे बँक स्थापन करण्याचे मोठे काम राहीबाईंनी केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात त्यांचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’ असा केला होता. त्यामुळे बीजमाता म्हणून त्या परिचित आहेत. राहीबाई अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या. आदिवासी समाजातील राहीबाई निरक्षर आहेत, पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या. शेतात त्याचा वापर करायच्या.  पुढे ‘बायफ’ संस्थेच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली. त्यांनी गावरान बियाणांची बँक स्थापन केली. कळसूबाई परिसरातून पारंपरिक बियाणे गोळा केले. आज राहीबाईंच्या बियाणे बँकेत ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. प्रत्येक बियाणाची माहिती त्यांना तोंडपाठ आहे. ते बियाणे औषधी आहे का, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्टय़े कोणती हे सगळे त्या सांगतात. त्यामुळे बियाणांचा चालताबोलता ज्ञानकोश त्यांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे. त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तरी या पुरस्काराने त्यांचे काम जगाच्या नकाशावर अधिक ठळकपणे आले आहे यात शंका नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader