काही व्यक्तींचे सामर्थ्य नेमके  कशात आहे, हे त्यांच्याकडे पाहून समजत नाही. त्यांनी ज्यांच्यासह काम केले आहे, अशांच्या अनुभवांतून ते स्पष्ट आकळत जाते अन् अनेकदा असे परिचित चेहरे पुन्हा नव्याने उमगू लागतात. रणजीत चौधरी या अवलिया कलाकाराच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात हा कलाकार बासू चॅटर्जी आणि हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांतून परिचयाचा झाला होता. मुख्य कलाकारांच्या यादीतला नसला, तरी त्याचा काहीसा विचित्र, गोंधळलेला, हसतमुख वावर प्रेक्षकांना हवाहवासा वाटे. त्यामुळेच गुरुवारी आलेल्या रणजीत चौधरी यांच्या निधनवार्तेने अनेकजण हळहळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पन्नास-साठच्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री पर्ल पदमसी या रणजीत यांच्या आई. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. रणजीत यांच्या लहानपणीच पर्ल यांनी आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि प्रसिद्ध जाहिरातकार अ‍ॅलेक पदमसी यांच्याशी विवाह केला. पर्ल आणि अ‍ॅलेक या दोघांमुळे रणजीत यांचेही नाटय़-चित्रपटविश्वाशी घट्ट सूर जुळले. हिंदी चित्रपटांतील रणजीत यांनी वठवलेल्या भूमिका या सत्तरच्या दशकातील काहीशा गोंधळलेल्या, सुख-दु:खांत हसतमुखाने मार्ग काढणाऱ्या शहरी नवतरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. अभिनेता म्हणून मुख्य धारेत किंवा चरित्र अभिनेता म्हणून रणजीत हिंदी चित्रपटात रुळले नाहीत. त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने जम बसवला तो अमेरिकेत.

ऐंशीच्या दशकात कॅनडात स्थायिक झाल्यानंतर मीरा नायर, दीपा मेहता, शेखर कपूर अशा अनवट प्रवाहातील चित्रपट दिग्दर्शकांशी त्यांची नाळ जुळली. मीरा नायर खूप आधीपासून रणजीत यांच्या अभिनयाने प्रभावित झाल्या होत्या. १९९१ मध्ये ‘मिसिसिपी मसाला’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणजीत यांचा मीरा नायर यांच्या वर्तुळात प्रवेश झाला आणि ते त्यानंतरही त्यांच्या चित्रपटांचा महत्त्वाचा भाग राहिले. कॅनडातील अनेक इंग्रजी चित्रपटांमधून त्यांनी काम केले. चांगल्या भूमिका करण्याची संधी त्यांना भारतात फारशी मिळालीच नाही. मात्र ही चांगल्या, सर्जनशील भूमिकांची भूक त्यांना अमेरिके त स्वस्थ बसू देत नव्हती. तेथील अनेक इंग्रजी चित्रपटांमधून त्यांनी काम केले. ‘लास्ट हॉलिडे’, ‘लोन्ली इन अमेरिका’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. मीरा नायर असोत वा दीपा मेहता; रणजीत यांच्याबरोबर काम केलेला प्रत्येक दिग्दर्शक त्यांच्याशी कायम जोडलेला राहिला. त्याचे कारण रणजीत यांच्या स्वभावात होते, तसेच ते त्यांच्या अभिनयातही होते.

बुद्धिमान, चतुरस्र, हरहुन्नरी अभिनेता अशाच शब्दांत रणजीत यांचे कौतुक त्यांच्या दिग्दर्शकांनी केलेआहे. छोटय़ा चणीचा, काहीसा किडकिडीत असा हा कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित अभिनेत्यांच्या साच्यात बसणारा कधीच नव्हता. मात्र त्यापलीकडे आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिकेला अभिनयाने एक वेगळी उंची देण्याची ताकद त्यांच्याकडे होती. ही ताकद फार कमीजणांना कळली. मात्र त्यांच्या काही ‘खूबसूरत’ भूमिकांच्या ‘खट्टा मिठा’ आठवणी जागवणारा त्यांचा चेहरा कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहील!