पंजाबी जमीनदार कुटुंबातल्या मुलीने ‘फिल्लम’मध्ये गाणे, हे जगजीत कौर यांच्या आयुष्यातील पहिले बंड; तर दुसरे, संगीतकार खय्याम (पूर्ण नाव मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी) यांच्याशी लग्न! या बंडखोर तरुण गायिकेचा आवाज मात्र अगदी आज्ञाधारक होता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुलाम मोहम्मद यांच्या संगीत-दिग्दर्शनात ‘खामोश ज्मिन्दगी को अफसाना मिल गया’सारखे १९५३ सालातील त्यांचे गाणे नूरजहाँ, सुरय्या यांच्या आवाजामधल्या ‘अखंड पंजाबी’ खुमारीची आठवण करून देणारे; पण दशकभरानंतर (१९६४) ‘बल्ले बल्ले ओ शेर पंजाबणदी’ या लोकगीताचे शहरी, हिंदी लग्नगीत-रूपांतर शोभणारे ‘देखो देखो, ओ गोरी ससुराल चली’  गाताना त्यांनी पंजाबी ठसका सोडून आवाजात बेमालूम शहरी सफाई आणली. मात्र याच ‘शगुन’ चित्रपटातले अधिक गाजलेले ‘तुम अपना रंज-ओ-ग़म अपनी परेशानी मुझे दे दो’ गाताना आवाजात पिढीजात गज्मलगायिकेचा आब! आवाजातल्या या आज्ञाधारकपणाची कमाल दिसली ती वयाच्या पन्नाशीत. चित्रपट होता १९८२ सालचा ‘बाज्मार’. जगजीतबाईंचा जन्म १९३० सालातला. चित्रपटातील १६-१७ वर्षांच्या कोवळ्या नायिकेचे (सुप्रिया पाठक) लग्न मनाविरुद्ध होत असताना ‘चले आओ सैंया रंगीले मै हारी रे’ हे लग्नगीत जगजीत गातात तेव्हा आवाजात पंजाबी ठसका आहे, पण तिचा प्रियकर तिला अखेरचे भेटू पाहातो तेव्हाचे ‘देख लो आज हमको जी भरके’ हे या शोकगीतात आकांत आणि हळुवार प्रेम यांचे अप्रतिम मिश्रण आहे.

१९६१ च्या ‘शोला और शबनम’ पासून ते १९८०च्या दशकाअखेपर्यंतची सगळी गाणी खय्याम यांच्यासाठीच जगजीत गायल्या. संगीतक्षेत्रातल्या ‘दोघीं’शीच काय, कुणाशीही आपली स्पर्धा नाही- आपण फक्त खय्यामची सहचरी- हे जणू जगजीत यांनी ठरवूनच टाकले असावे. त्यांचे अखेरचे गाजलेले गाणे म्हणजे ‘उमराव जान’मधले ‘काहे को ब्याही बिदेस’ हे विदाईगीत. स्वत:चे लग्न घरच्यांच्या विरोधामुळे कसेबसे उरकावे लागलेल्या जगजीत कौर यांची लग्नगीते बरीच आहेत, तीही पतीनेच दिली आहेत, हा योगायोगच!

खय्याम-जगजीत कौर यांचा सुरेल संसार १९५४ पासूनचा. पण एकुलता मुलगा २०१२ मध्ये गेल्यावर जगजीत कौर खचल्या आणि गेल्याच वर्षी खय्याम गेले, तेव्हापासून तर चाकाच्या खुर्चीला खिळल्या. अखेर १५ ऑगस्टला त्याही खय्यामसारख्याच सुरलोकी गेल्या.