पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र म्हणजेच ‘आयुका’ ही भारतातच नव्हे, तर जगात नाव असलेली संशोधन संस्था ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. त्यानंतर देशोदेशीचे संशोधक येथे येऊन संशोधन करीत आहेत. आता या संशोधन संस्थेच्या संचालकपदाची धुरा सोमक रायचौधुरी हे सांभाळणार आहेत. संचालकपदाची सूत्रे हाती घेतानाच त्यांनी ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ या २८ सप्टेंबरला सोडल्या जाणाऱ्या अवकाश दुर्बीण असलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणारी माहिती संशोधन संस्थांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. विज्ञानातील माहितीची कवाडे सर्वाना खुली असली पाहिजेत, अन्यथा ज्ञानविस्तार होणार नाही, हा त्यामागचा त्यांचा व्यापक दृष्टिकोन आहे.
डॉ. रायचौधुरी सुरुवातीच्या काळापासून आयुका या संस्थेशी संबंधित आहेत. याआधी ते कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात नसíगक व गणितीय विज्ञान शाखेचे अधिष्ठाता व भौतिकशास्त्र विभागात प्रमुख होते. त्यांनी दीíघकांच्या महागुच्छांवर (सुपरक्लस्टर्स ऑफ गॅलेक्सीज) संशोधन केले आहे. त्यांनी दीर्घिकांची (गॅलेक्सी) व उत्क्रांती, तसेच जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे, गुरुत्वीय िभगे यातही संशोधन केले आहे. त्यांचा जन्म कोलकात्यातला. ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून भौतिकशास्त्राचे अध्ययन केले व नंतर केम्ब्रिज विद्यापीठातून खगोलभौतिकीत डोनाल्ड िलडन बेल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी घेतली. नंतर अमेरिकेत त्यांनी हार्वर्ड स्मिथसॉनियन खगोलभौतिकी केंद्रात चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीच्या (या दुर्बिणीला सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे नाव दिले आहे) निर्मितीसाठी काम केले. त्यानंतर पाच वष्रे त्यांनी आयुकात अध्यापनाचे काम केले आहे. दोनशे शाळांमधून आयुकाने विज्ञान प्रसाराचे काम केले आहे, तसेच सायन्स पार्कच्या उभारणीत मोठा वाटा उचलला आहे. डॉ. रायचौधुरी यांनी बìमगहॅम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विभागात बारा वष्रे अध्यापन केले. २०१२ मध्ये ते भारतात परत आले. आयुकाचे संचालक होण्याआधी सध्या ते कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात कार्यरत होते. इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनचे सदस्य, तर रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व युरोपियन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते फेलो आहेत. त्यांना न्यूटन विद्यावृत्ती, स्लॅडेन व स्मिथ पुरस्कार असे मानसन्मानही मिळालेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा