शासकीय अधिकारपदावरून निवृत्त झाल्यानंतरही एखादी व्यक्ती स्मरणात राहू शकते, याचे अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे  वि. वि. चिपळूणकर. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि त्यांनी घालून दिलेली घडी नंतरही काही काळ तशीच सुरू राहण्यात चिपळूणकरांचे महत्त्व लपलेले होते. शासकीय चौकटीत राहून एखादी संस्था उभी करणे आणि ती यशस्वीपणे चालविणे यासाठी कार्यप्रवण माणसे घडवावी लागतात. औरंगाबाद येथे निवासी विद्या निकेतनचा प्रयोग सुरू केल्यानंतर चिपळूणकरांना जेव्हा विचारले जायचे, ‘तुमची मुले किती?’ तेव्हा त्यांच्याकडून उत्तर यायचे २०३. त्या वेळी राज्याच्या शिक्षण क्षेत्रात निवासी शाळा ही संकल्पना नव्हती. ती त्यांनी रुजवली आणि ग्रामीण भागातील अनेक मुलांना त्याचा मोठा लाभ झाला.

१९४८ साली माध्यमिक शिक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू झालेल्या चिपळूणकरांनी १९६० मध्ये शिक्षण प्रशासन सेवा वर्ग-१ मध्ये प्रवेश केला आणि नंतर राज्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विचारांची व्यापकता पुढेही वाढवत राहावी लागली. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नापास करणे गैर आहे, असे ते म्हणायचे. पुढे विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई येथे उत्कृष्ट कार्य केल्यानंतर शिक्षण संचालकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तत्पूर्वी १९७४ ते १९७६ या काळात अभ्यासक्रम तयार करणाऱ्या राज्य पाठय़पुस्तक महामंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रात वापरला जाणारा ज्ञानरचनावाद हा शब्द त्यांनी शिक्षणात फार पूर्वीच आणण्यास सुरुवात केली होती. शालेय गुणवत्ता विकासाचा संपर्काधिष्ठित कार्यक्रम आणि सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना या महत्त्वपूर्ण योजना त्यांच्या कार्यकाळात झाल्या. या कार्यक्रमांना त्यांनी आकारही दिला. निवासी शाळांमध्ये मुले जेव्हा येत, तेव्हा आईच्या आठवणीने त्यांना रडू यायचे. मग चिपळूणकर सर म्हणायचे, ‘डोळे झाका आणि मनात आणा, आई काय करीत असेल?’ मग मुले सांगायची, आई स्वयंपाक करते, धुणी-भांडी करते. वेगवेगळी उत्तरे यायची. तेव्हा ते म्हणायचे, ‘आई इथे नसली तरी ती सर्वत्र असते. दिसली की नाही डोळे झाकल्यानंतर?’ मुलांशी असणारा हा संवाद विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीशी त्यांचे नाते सांगण्यास पुरेसा ठरावा. शिक्षक संच मान्यता, शाळांच्या वर्गखोल्यांचे बांधकाम असे विषय प्राधान्याचे बनले नसल्याच्या काळात अध्ययन-अध्यापनातील आनंददायी शिक्षणाचे धडे कसे दिले जावेत, याचे मार्गदर्शन विद्याधर विष्णू उपाख्य वि. वि. चिपळूणकर करीत. मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना त्यांच्या अनेक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले होते.  शिक्षण विभागात घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांचे हित साधले जाते काय, या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक असेल तरच तो निर्णय घ्यावा, असे ते मानत असत. सहज, सोप्या भाषेत ज्ञानरचनावादाची मांडणी करणारे चिपळूणकर विद्यार्थ्यांचे मन ओळखणारे होते.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
supreme Court
Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
Atul Subhash suicide case child custody
Atul Subhash Case: ‘आजी त्याच्यासाठी अनोळखी’, अतुल सुभाष यांच्या आईला नातवाचा ताबा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Story img Loader