सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘इंडिया’ व ‘भारत’ या विधानावर आता खुलासे केले जात आहेत. त्यातून एका मनोवृत्तीचे दर्शन होते आहे.ज्या काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या विधवा काशीबाईच्या मुलाला दत्तक घेतले, त्या काळात ‘इंडिया’ तर नव्हताच ‘भारत’ सुद्धा नव्हता. तेव्हा होता तो फक्त ‘हिंदुस्थान’ आणि त्या हिंदुस्थानात असलेल्या नीतिमत्तेबद्दल काय लिहावे!
ज्योतीरावांनी १८५३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली तीच मुळी विधवांवर होणाऱ्या बलात्कारातून जन्माला येणाऱ्या मुलांवर आणि विधवांवर मरण्याची वेळ येऊ नये म्हणून. १८५३ साली स्थापन झालेल्या या गृहात १८७३ सालापर्यंत ९६ विधवांची बाळंतपणे झाली.
भागवती मनोवृत्तीचे आणखी एक आवडते समीकरण आहे ते म्हणजे मुलींचे अति तोकडे कपडे हे बलात्काराला कारणीभूत आहेत. इतिहास पाहिला असता प्रश्न निर्माण होतो की, हिंदुस्थानातल्या विधवा तोकडे कपडे घालत होत्या का? त्या विधवांच्या राहण्यावर असलेली धर्माची कडक बंधने आम्ही भागवतांना सांगण्याची गरज नसावी. तेव्हा त्या विधवांवर मातृत्व लादणारे कोण असायचे, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. महिलांवर बलात्कार ही काही केवळ आजचीच गोष्ट नाही. मनुस्मृतीतही आठव्या अध्यायात राजाने वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोणत्या शिक्षा कराव्या, हे सांगताना बलात्काराच्या गुन्ह्याचाही चांगला तपशीलात विचार केलेला आहे. मोहन भागवतांना मनुस्मृतीचा अभ्यास असणारच.फॅशन शो, सौंदर्य स्पर्धा, चित्रपट व दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील नृत्याच्या कार्यक्रमात नुसते तोकडेच नाही, तर गलिच्छ कपडे घालणाऱ्या स्त्रियांवर कधी बलात्कार झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र त्याबाबत बोलण्याचे हे ठिकाण नव्हे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा