बिल्डरांवर अंकुश ठेवणारे ‘नियामक प्राधिकरण’ येईल तेव्हा येवो.. आज आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेणाऱ्या सर्वसामान्यांची बिल्डर्सकडून सर्रास फसवणूक केली जाते. इमारतीची जाहिरात करताना सदनिकेचे दाखविण्यात येणारे क्षेत्र आणि प्रत्यक्ष क्षेत्र यात तफावत असणे, जिना, पॅसेजमधील मोकळी जागा, टेरेस इ. सामायिक क्षेत्रांचे पैसे आकारणे, पार्किंग्ज विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना व ग्राहकांजवळ गाडय़ा नसताना सदनिकेसोबत पार्किंग खरेदीची सक्ती करणे. ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणे (ज्यामुळे ग्राहक कंटाळून पैसे काढून घेतील व बिल्डर्सना ते फ्लॅट जादा भावाने दुसऱ्यांना विकू शकतील.) बुकिंग करताना जाहीर केलेल्या रकमेत कालांतराने वाढ करणे, ओ. सी., सोसायटी रजिस्टर करणे, कन्वेअन्स करून देणे यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई करणे, करारपत्रात मान्य केलेल्या सुविधा (गार्डन इ.) न देणे अशा असंख्य प्रकारे हे बिल्डर्स ग्राहकांना लुबाडत असतात.
पोलीस, म्युनिसिपालिटी इत्यादी सर्व सरकारी यंत्रणाच काय, खुद्द सरकारच यांच्या खिशात असल्याने आज या बिल्डर्सना मोकळे रान मिळाले आहे. अमर्याद संपत्तीमुळे सर्व कायदे, नियम यांच्यासाठी वाकवले जातात. सर्व सरकारी कार्यालयांत या बिल्डर्सना रेड कार्पेट वागणूक मिळत असते.
अशा या अप्रामाणिक बिल्डरांविरुद्ध कोर्टात दाद मागण्यास सामान्य जनतेला ना वेळ असतो, ना शक्ती, ना पैसा. तेथेही हे बिल्डर्स महागडय़ा वकिलांची फौज खडी करून सामान्य एकटय़ा- दुकटय़ा ग्राहकास जेरीस आणू शकतात. काही बिल्डर्स तर ग्राहकांस धाक दाखवण्यासाठी गुंडही बाळगतात.
बिल्डर्सकडून सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्याच्या उद्देशाने गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद चार वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणात करण्यात आली तरी धनदांडग्या बिल्डरलॉबीच्या दबावामुळे बिल्डर्सवर अंकुश ठेवण्यासाठी नियामक प्राधिकरण स्थापन होईल की नाही याबद्दल साशंकताच आहे.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये बिल्डर्सकडून वारेमाप निधी येत असल्याने व निवडणुका तोंडावर आल्याने जर असे प्राधिकरण स्थापन झालेच तर त्यात बिल्डरांचेच हित पाहिले जाईल हे ओघाने आलेच. २जी स्कॅममध्ये तुरुंगात गेलेल्या एका बिल्डराच्या खासगी विमानातून फिरणाऱ्या राजकारण्यांकडून आम्ही पामरांनी काय अपेक्षा करावी?दर पाच वर्षांनी मताचा जोगवा मागणाऱ्या या राजकारण्यांनी आम्हाला बिल्डर, साखरसम्राट व शिक्षणसम्राटांच्या तोंडी दिले आहे.
बिल्डरांच्या तोंडी..
बिल्डरांवर अंकुश ठेवणारे ‘नियामक प्राधिकरण’ येईल तेव्हा येवो.. आज आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेणाऱ्या सर्वसामान्यांची बिल्डर्सकडून सर्रास फसवणूक केली जाते. इमारतीची जाहिरात करताना सदनिकेचे दाखविण्यात येणारे क्षेत्र आणि प्रत्यक्ष क्षेत्र यात तफावत असणे, जिना, पॅसेजमधील मोकळी जागा, टेरेस इ. सामायिक क्षेत्रांचे पैसे आकारणे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are in the hands of the builders