यंदाचे रेल्वे बजेट एका वेगळ्या कारणाने उठून दिसते आणि ते म्हणजे प्रवासी तिकिटात वाढ नाही आणि उगाच सवंग लोकप्रियतेच्या घोषणा नाहीत. लोकांना सांगितलेल्या सुधारणा करायची इच्छा दिसतेच, पण पशाचे सोंग आणता येत नाही याची जाणीवही दिसते. त्याबद्दल सर्वसंबंधितांचे अभिनंदन. पुढे जाण्यासाठी मार्ग नक्कीच सापडेल.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा कामाचा सपाटा म्हणजे योजना, कायदा आणि पसेवाटप. एवढे झाले म्हणजे आपण जनकल्याणाचे पवित्र काम केले अशीच त्यांची समजूत. दुष्काळ, आरोग्य-योजना, शालेय माध्यान्ह भोजन, गणवेश सगळीकडे एकच फॉम्र्युला! योजनेची मंजुरी आणि निधीवाटप.
या पाश्र्वभूमीवर सुरेश प्रभू यांचे ‘अंथरुण पाहून पाय पसरावेत’ धोरण स्वागतार्ह आहे. मुंबईतील लोकलच्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याचे (चर्चगेट-विरार, किंवा सीएसटी-कल्याण-कसारा/ कर्जत) आणखी सलग लोहमार्ग निर्माण करणे अशक्य आहे, तर आहे त्या मार्गावर अजून गाडय़ा वाढविणेही कठीण आहे असे मत अनेकांनी पूर्वी व्यक्त केले आहे. दुसरीकडे रेल्वेमंत्री ‘वातानुकूलित’ लोकल सुरू करण्याचे बोलत आहेत. या गाडय़ांचे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने चालू-बंद होण्यासाठी दर स्थानकावर वाढीव वेळही लागेल, आणि दर बोगीतून वाहिलेल्या प्रवाशांची संख्याही कमी होईल; कारण दरवाजात कोणी उभे राहू शकणार नाही.
याचबरोबर आणखीन एक प्रयोग करता येईल, तो म्हणजे दुमजली रेक्स! यापूर्वी मधू दंडवते यांनी दुमजली डब्यांची ‘सिंहगड’ याच मार्गावर चालवून दाखवली होती. मात्र लोकलमधील प्रवासी कमीतकमी सामान घेऊन प्रवास करणारे असल्यामुळे डब्यांची रचनाही सुटसुटीत होऊ शकेल. सामानाची वाहतूक करण्यासाठी १-२ डबे आताच्या पद्धतीचे असू शकतील. मंत्री महोदय व तज्ज्ञांनी जरूर विचार करावा.
रेल्वे अर्थसंकल्प आणि पुढे..
यंदाचे रेल्वे बजेट एका वेगळ्या कारणाने उठून दिसते आणि ते म्हणजे प्रवासी तिकिटात वाढ नाही आणि उगाच सवंग लोकप्रियतेच्या घोषणा नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-02-2015 at 12:56 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What next of railway budget