डॉ. निखिल लाटे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला २८ जुलैपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेपूर्वी भारताच्या पाच खेळाडूंची उत्तेजक चाचणी सकारात्मक आली. त्यामध्ये एस. धनलक्ष्मी (धावपटू) आणि ऐश्वर्या बाबू (तिहेरी उडीपटू) यांचा समावेश आहे. पॅरालिम्पिकमध्ये सहभाग नोंदवणारे अनीश कुमार (पॅरा थाळीफेकपटू) आणि गीता (पॅरा पॉवरलिफ्टिंगपटू) हे खेळाडूही उत्तेजक चाचणीत दोषी आढळले. यामुळे देशाच्या कामगिरीवर फरक पडेल. आपल्या देशासाठी पदक मिळवण्याकरिता काही खेळाडू चुकीचा मार्ग अवलंबतात, तर काही जणांना उत्तेजकांबाबत पुरेशी माहिती नसते.

constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
WTC Points Table India slip to 3rd after after IND vs AUS Pink Ball Test Defeat Australia No 1 again
WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा

उत्तेजक चाचणीत खेळाडूच्या लघवी आणि रक्तांच्या नमुन्याच्या माध्यमातून प्रतिबंधित पदार्थांबाबत माहिती घेतली जाते. या नमुन्यांमध्ये प्रतिबंधित केलेले पदार्थ आढळले, तर खेळाडूवर बंदी घालण्यात येते. कोणत्याही खेळाडूची चाचणी करायची झाल्यास त्याची नियमावली ही अतिशय कठोर आहे. खेळाडूला आपल्या रक्त तसेच लघवीचा नमुना चाचणी घेणाऱ्या संस्थेला द्यावा लागतो. त्यानंतर हा नमुना जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेची (वाडा) मान्यता असलेल्या प्रयोगशाळेत जातो. खेळाडूंकडून ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन नमुने घेतले जातात. ‘अ’ नमुना सुरुवातीला चाचणीसाठी दिला जातो. या चाचणीचा निकाल नकारात्मक आला, तर खेळाडूला काहीच अडचण निर्माण होत नाही. मात्र, निकाल सकारात्मक आल्यास खेळाडूचा ‘ब’ नमुना चाचणीसाठी वापरण्यात येतो. यंत्रात तांत्रिक बिघाड किंवा नमुना घेताना काही चूक झाल्यास ‘ब’ नमुन्याचा पर्याय दिला जातो. ‘ब’ नमुनाही सकारात्मक आल्यास खेळाडू दोषी समजला जातो आणि त्यावर बंदी घातली जाते.

ज्या पदार्थांचा वापर केल्याने तुमच्या कामगिरीत सुधारणा पाहण्यास मिळते, असे पदार्थ प्रतिबंधित पदार्थ समजले जातात. कॉफीचे सेवन केल्यानेही तुमची कामगिरी सुधारते. मात्र कॉफी प्रतिबंधित पदार्थ नाही. ॲनाबॉलिक स्टेरॉइड ज्यामुळे स्नायूंना बळकटी मिळते. तसेच, टेस्टॉस्टेरॉन आणि ॲड्रीनलिनसारख्या पदार्थांमुळे कामगिरी उंचावण्यास मदत होते. त्याचा वापर करणे निषिद्ध आहे. अँटिबायोटिक्स आणि त्वचेच्या क्रीम या प्रतिबंधित केल्या जात नाही, कारण त्यांच्यामुळे कामगिरीवर काहीच परिणाम होत नाही. पेनकिलर्सचाही वापर करता येतो.

‘वाडा’कडून आगामी वर्षातील प्रतिबंधित पदार्थांची यादी दर ऑगस्टला जाहीर केली जाते. ‘वाडा’च्या संकेतस्थळावर ही यादी उपलब्ध असते. एखादा खेळाडू त्या आधी यादीत नसलेल्या एखाद्या प्रतिबंधित पदार्थाचे सेवन करत असेल आणि आता ‘वाडा’ने त्याचा नवीन यादीत समावेश केला तर अशा वेळी खेळाडूला आपण घेत असलेल्या पदार्थाची माहिती ‘वाडा’ला द्यावी लागते. मारिया शारापोव्हाचे उदाहरण यासंदर्भात देता येईल. ती दहा वर्षं एक औषध घेत होती. नवीन नियमावलीत हे औषध प्रतिबंधित करण्यात आले होते, मात्र तिला आणि तिच्या वैद्यकीय पथकाला याची कल्पना नव्हती. त्यामुळे ती उत्तेजक चाचणीत दोषी आढळली. त्याकरिता तिला दोन वर्षांच्या प्रतिबंधाचा सामना करावा लागला.

जे खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळतात त्यातील अनेकांना या प्रतिबंधित पदार्थांबाबत माहिती नसते. कोणाच्या तरी सांगण्यावरून हे खेळाडू पदार्थ घेतात, मात्र पुढे जाऊन त्यांना फटका बसतो. उदाहरण द्यायचे झाल्यास जर खेळाडू प्रोटीन सप्लीमेंटचा वापर करत असेल आणि ते नोंदणीकृत विक्रेत्यांकडून न घेता दुसऱ्या कोणाकडून घेतले तर अडचण निर्माण होते. काही जण कामगिरी उंचावण्यासाठी जाणूनबुजून पदार्थांचे सेवन करतात अशा घटनाही समोर आल्या आहेत.

उत्तेजक चाचणीची नियमावली कडक असते. चाचणीसाठी बोलावले आणि खेळाडू गैरहजर राहिल्यास खेळाडूंच्या यादीनुसार कारवाई होते. ही ‘ॲडम्स’ नावाची खेळाडूंची यादी असते, यामध्ये जगभरातील आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास या यादीत नीरज चोप्रा, मीराबाई चानूसारखे खेळाडू असतात. यासह अनेक ऑलिम्पिक पदकविजेते किंवा पदक मिळवण्याचे प्रबळ दावेदार असणारे खेळाडूही या यादीत येतात. या खेळाडूंना आपल्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती ‘वाडा’ला द्यावी लागते. कारण, ते कधीही चाचणी घेण्यासाठी येऊ शकतात. मी तिरंदाजी संघासोबत होतो, तेव्हा जयंत तालुकदार आणि दीपिका कुमारी यांचा समावेश ‘ॲडम्स’ यादीत होता. त्या वेळी त्यांना विमानाच्या प्रवासाबाबतही माहिती द्यावी लागली. ही यादीही नेहमी बदलत असते. खेळाडू जास्तीत दोन वेळा योग्य कारण देऊन चाचणी करण्यास नकार देऊ शकतो. तिसऱ्यांदाही चाचणी न केल्यास खेळाडूवर बंदी घातली जाते. दुसऱ्या आणि विभागातील खेळाडूंसाठी काहीशी शिथिल असते. त्यांची चाचणी स्पर्धेदरम्यान आणि निवड चाचणीदरम्यान घेतली जाते. ती न केल्यास खेळाडूंवर बंदी घातली जाते.

उत्तेजक चाचणीत खेळाडू पहिल्यांदा दोषी आढळल्यास त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली जाते. दुसऱ्यांदा खेळाडू दोषी आढळल्यास त्याच्यावर आठ ते दहा वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. खेळाडूंना आपल्या शिक्षेसाठी दाद मागता येते. खेळाडूने योग्य पुरावे दिल्यास त्याची शिक्षा कमी केली जाऊ शकते. ‘वाडा’चा विभाग या संदर्भातील सुनावणी घेतो. खेळाडू स्वतः आपली बाजू मांडू शकतात किंवा संघटनेतर्फे आपली भूमिका ‘वाडा’समोर ठेवू शकतात. कुस्तीगीर नरसिंह यादवचीही शिक्षादेखील कमी करण्यात आली होती. त्यामुळे खेळाडूलाही आपली बाजू मांडता येते.

‘वाडा’चे नियम हे जगभरात सारखेच आहेत. प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था (नाडा) असते. स्पर्धा आणि निवड चाचणीदरम्यान करण्यात येणाऱ्या सर्व चाचण्या या ‘नाडा’मार्फत केल्या जातात. सर्व खेळांसाठीच्या उत्तेजक चाचण्या या ‘नाडा’ करते. ‘नाडा’ने केलेल्या चाचण्या ‘वाडा’ही अधिकृत मानते. त्यामुळे बाहेरील प्रयोगशाळेत केलेली चाचणी ही ग्राह्य धरली जात नाही. क्रिकेट हा खेळ ‘नाडा’अंतर्गत येत नाही. उत्तेजक चाचणीकरिता ‘बीसीसीआय’ची वेगळी समिती आहे.

‘वाडा’ आणि ‘नाडा’कडून खेळाडूंमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. मी राष्ट्रीय संघासोबत होतो तेव्हा अनेक कार्यशाळा व्हायच्या. खेळाडू आणि प्रशिक्षक यामध्ये सहभाग नोंदवायचे. संघासोबत वैद्यकीय पथक असेल तर त्यांच्यासाठीही वेगळी कार्यशाळा व्हायची. यासह उत्तेजक चाचणी संदर्भातील नियमावलीची माहितीही त्यांना दिली जाते.

‘वाडा’ची कार्यपद्धती ही नेहमीच पारदर्शक असते. त्यांच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असते. यामध्ये नियमावलीसह ‘नाडा’ची सर्व यादीही मिळते. त्यांची कार्यप्रणाली कशी असते हेदेखील कळते. उत्तेजकांच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील खेळाडूंना पुरेशी माहिती नसते. ॲथलेटिक्समध्ये आपण जागतिक स्तरावर इतर देशांच्या तुलनेत मागे आहोत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडील प्रशिक्षण यंत्रणा.

बॅडमिंटनमध्ये आपल्याकडचे सर्वाधिक खेळाडू गोपीचंद अकादमीमधून पुढे येताना दिसतात. यामध्ये खेळाडूंसह गोपीचंद यांचेही तितकेच योगदान आहे. इतर खेळांमध्ये खेळाडूंना उच्च स्तरावरील प्रशिक्षण मिळत नाही. खेळाडू मेहनतीने राष्ट्रीय संघात पोहोचतो तेव्हा त्याला चांगल्या प्रशिक्षण सुविधा मिळतात. माझ्या मते आपल्याकडे चांगल्या प्रशिक्षण सुविधा आणि खेळाडू आहेत, परंतु पायाभूत स्तरावर चांगल्या प्रशिक्षणाचा अभाव आहे.

डॉ. निखिल लाटे (लेखक फिजिओथेरेपिस्ट आणि स्पोर्ट्स सायंटिस्ट आहेत)

शब्दांकन : संदीप कदम

Story img Loader