फिक्शन
१) रेसीडय़ू : निताशा कौल, पाने : ५००३३२ रुपये.
‘द मॅन एशियन लिटररी प्राइज’साठी नामांकन मिळालेली ही कादंबरी आहे. फाळणीमुळे विस्थापित झालेल्या मुलांनी त्यांच्या कुटुंबांचा आणि नातेवाईकांचा घेतलेला शोध हे या कादंबरीचे सूत्र. यातील पात्रं भारतीय असली तरी ती आता भारत, बर्लिन आणि इंग्लंड अशा ठिकाणाहून भारतातील आपल्या नातेवाईकांकडे पाहतात आणि फाळणीविषयी बोलतात.
२) बी केअरफूल व्हॉट यू विश फॉर : जेफ्री आर्चर, पाने : ४००३९९ रुपये.
जेफ्री आर्चरची ही नवी कादंबरी. म्हणजे नवी रहस्यमय कादंबरी. तुम्ही जेफ्रीचे चाहते असाल तर तुम्हाला ही कादंबरी आवडेलच, आणि समजा नसाल तर वेगळा असा अनुभव घ्यायचा असेल तर या कादंबरीच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही.
३) पँटी : संगीता बंदोपाध्याय, पाने : २३६४९९ रुपये.
हा दोन लघुकादंबऱ्यांचा संग्रह आहे. इंग्रजीत असा प्रकार फारसा लोकप्रिय नाही. त्यात या कादंबऱ्या मूळ बंगालीतून अनुवादित झालेल्या. पुन्हा त्या इरॉटिक म्हणाव्या अशा. त्यामुळे ज्यांना अशा विषयात रस असतो त्यांनाच अशा कादंबऱ्या आवडू शकतात.
नॉन-फिक्शन
१) 14- स्टोरीज दॅट इन्स्पायर्ड सत्यजित राय : भास्कर चटोपाध्याय,
पाने : २२४३५० रुपये.
सत्यजित राय यांचा अविस्मरणीय मानला जाणारा प्रत्येक सिनेमा हा कुठल्या ना कुठल्या साहित्यकृतीवर बनवला गेला. प्रस्तुत पुस्तकात प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर यांसारख्या चौदा लेखकांच्या कथा आहेत, ज्यावर राय यांनी सिनेमे बनवले आहेत. आणि जे वाखाणले गेले आहेत. या कथा राय यांना का भावल्या, त्याच्या या कथा आहेत.
२) कॉन्व्हर्शेनन्स इन न्यूड : मिहिर श्रीवास्तव, पाने : २२४५९९ रुपये.
दिल्लीस्थित पत्रकाराचं हे अतिशय वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. या पत्रकाराला सार्वजनिक जीवनात ज्या नग्नतेला बंदी आहे त्याविषयी लिहायला आवडतं आणि त्याची स्केचेस करायलाही. त्याचे चित्तचक्षुचमत्कारिक अनुभव त्याने यात दिले आहेत.
३) अ स्ट्रेंज काइन्ड ऑफ पॅराडाइज : सॅम मिलर, पाने : ४४०/५९९ रुपये.
अनेक वर्षे दिल्लीत राहिलेल्या आणि भारतभर प्रवास केलेल्या पाश्चात्त्य पत्रकाराचं हे भारताविषयीचं अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक. अलेक्झांडर, ग्रीक व्यापारी, वास्को द गामा, बाबर, मार्क ट्वेन, बीटल्स, स्टीव्ह जॉब्ज यांना भारतात का यावंसं वाटलं, त्यामागे कोणत्या प्रेरणा होत्या, त्याचा हा शोध.
विशलिस्ट
फिक्शन१) रेसीडय़ू : निताशा कौल, पाने : ५००३३२ रुपये.'द मॅन एशियन लिटररी प्राइज'साठी नामांकन मिळालेली ही कादंबरी आहे. फाळणीमुळे विस्थापित झालेल्या मुलांनी त्यांच्या कुटुंबांचा आणि नातेवाईकांचा घेतलेला शोध हे या कादंबरीचे सूत्र. यातील पात्रं भारतीय असली तरी ती आता भारत, …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-03-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wish list