कार्यपद्धती: बेशिस्त वाहनांची आणि पोलिसांची
आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीबरोबरच २५ डिसेंबरच्या अंकात एकीकडे महामार्ग-विभागाचे अतिरिक्त पोलीस संचालक विजय कांबळे यांचे एक निवेदनही प्रसिद्ध झालेले आहे. ‘‘अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी आम्ही घेतो,’’ असे त्यांचे विधान पूर्णत: खोडसाळपणाचे आहे, हे महामार्गावरून नेहमी प्रवास करणारा कोणीही प्रवासी सांगू शकेल. रात्री दहाच्या नंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पूर्णपणे जंगलराज असते. घाटाच्या दोन ओळींच्या अरुंद मार्गामध्ये मुंबईच्या गोदीतून माल भरून निघालेली जड व अवजड वाहने सर्वच ओळींमधून मुक्तपणे रांगत वाहतूक अडवतात. त्याउलट रिकाम्या मालगाडय़ा वेगात स्वैरपणे इथून तिथून विहरत असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी लहान गाडय़ा हुतुतू खेळत प्रत्येक फटीतून घुसत असतात. अनेक जड वाहनांना पुढचे किंवा मागचे दिवे नसतात. मागे परावर्तक नसतात. काहींच्या वाहनातील सळ्या किंवा वाहनातील अवजड यंत्राचा लांबुळका भाग बाहेर आलेला असतो आणि तो रात्री अगदी जवळ आल्याशिवाय मागच्या वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. पण प्रत्येक टप्प्यावर समांतर पोलीस व्यवस्थेचा खासगी कर भरल्यामुळे त्यांना कोणीच अडवत नसते. याउलट दिवसा अनेकदा पोलिसांची एक गाडी व चार-पाच पोलीस अधिकारी घाटाचा चढ सुरू होण्याच्या भागात विशिष्ट मोक्याच्या ठिकाणी उभे असतात. मग बाजूने जाणाऱ्या प्रत्येक जड वाहनातून एक हात बाहेर येतो, एक पोलीस त्याच्या हाताला हात लावतो आणि मग पोलीस तोच हात आपल्या खिशात घालतो. असे मूकनाटय़ उघडपणे चाललेले अनेकदा दिवसाढवळ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिसते. आता या पाश्र्वभूमीवर कांबळेंचे निवेदन ऐकून त्या बिचाऱ्यांना आपल्या खात्याच्या कार्यपद्धतीची माहितीच नसावी असे वाटते.
– सलील कुळकर्णी, कोथरूड, पुणे.
कार्यपद्धती: बेशिस्त वाहनांची आणि पोलिसांची
कार्यपद्धती: बेशिस्त वाहनांची आणि पोलिसांची आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीबरोबरच २५ डिसेंबरच्या अंकात एकीकडे महामार्ग-विभागाचे अतिरिक्त पोलीस संचालक विजय कांबळे यांचे एक निवेदनही प्रसिद्ध झालेले आहे. ‘‘अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी आम्ही घेतो,’’ असे त्यांचे विधान पूर्णत: खोडसाळपणाचे आहे, हे महामार्गावरून नेहमी प्रवास करणारा कोणीही प्रवासी सांगू शकेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-12-2012 at 12:14 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Working style indisciplined vehicle and police