पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगाव्ॉटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आता ही वीज आकाशात कशी तयार होते व या विजेपासून सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे, हे आपण बघू या.
पावसाळ्याच्या सुरूवातीला उन्हाळ्यात जमिनीजवळची तापलेली गरम हवा आकाशात वर वर जाते. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार-गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. अधिक घनभार (Positive Charge) हा ढगांच्या वरच्या बाजूला ओढला जातो किंवा तयार होतो व ऋणभार (Negative Charge) हा ढगांच्या खालच्या बाजूला स्थिरावतो किंवा खालच्या बाजूला तयार होतो. जसे जसे हे घनभारित व ऋण भारित ढग जमिनीवरून वाहू लागतात, तसे तसे जमीन व त्यावरील झाडे व उंच इमारती यांच्यात घनभार (Positive Charge) तयार होतो. हा भारांचा फरक (Differance Between the charges) वाढत जातो, तसा तसा ढग व जमीन यांच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो. (Electrical current begins to move) विद्युत प्रवाह (Electrical current) हा वाहण्यासाठी नेहमी जवळचा मार्ग शोधतो जेव्हा तो आपला मार्ग पूर्ण करतो. (When it completes the circuit it releases the Energy in the form of light) तेव्हा ही एनर्जी प्रकाशाच्या रुपात मुक्त होते व आपल्याला वीज कडाडताना दिसते. विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.
वीज पडल्यावर काही लोक मरतात, काही जखमी होतात; काही भाजतात; काही अपंग होतात. काहींना हार्ट अॅटॅक येतो. वीज झाडांवर पडल्यास मोठमोठे वृक्ष कोलमडतात तसेच काही जळून खाक होतात. मोठय़ा इमारतीवर वीज पडल्यांस इमारत कोसळते. जमिनीवर पडल्यास जमिनीत मोठा खड्डा पडतो. आता या विजेपासून आपण आपला व आपल्या संपत्तीचा बचाव कसा केला पाहिजे? हे बघू या. काळे काळे ढग दाटीवाटीने आकाशात जमा झाले, की समजावे आता हमखास वीज कडाडणार आहे. तुम्ही जर अशा वेळेला बाहेर असाल तसेच तेव्हा पाऊस सुरू झाला असेल व तुम्हाला जर वीज कडाडण्याचा आवाज आला; तर प्रथम स्वत:ला सुरक्षित करा. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही स्वत:च्या घरांत किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा. गुरांचा उघडा गोठा किंवा एखादे शेणाचे शेड तुमचा विजेपासून बचाव करू शकणार नाही हे पक्के लक्षात ठेवा. एकदा का तुम्ही घरांत शिरलात की कुठलेही वायू असलेले इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळू नका; वापरू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. तसेच दारे व खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह (करंट) तारांमधून; केबल मधून; तसेच पाईप मधून वाहून तुमच्या शरीराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो. पाऊस व वीज होत असताना एखादी इमारत जवळ नसेल तर झाडाखाली चुकूनही उभे राहू नका. हातात छत्री असेल तर बंद करून दूर टाकून द्या, मोकळ्या मैदानांत झाडापासून दूर उभे रहा. एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती तुमच्यापासून दूर फेकून द्या किंवा दूर ठेवून द्या. लोखंडाकडे किंवा तांब्याकडे वीज लगेच (अॅट्रॅक्ट) आकृष्ट होते. जुन्याकाळी विजा होत असताना लोक एखादा लोखंडाचा मोठा चमचा, पळी किंवा पावशी पळस बागेत फेकून देत असत. ते ह्य़ांचसाठी की वीज तिकडे आकर्षित (अॅट्रॅक्ट) व्हावी व घरावर पडू नये.वीज चमकत असताना तुम्ही जर तलावात पोहत असाल किंवा समुद्रात बोटीवर असाल तर पोहणे बंद करून ताबडतोब पाण्यातून बाहेर जमिनीवर या. एखाद्या कारमध्ये (मोटारीत) शिरा. मोठी बोट असल्यास त्याच्या के बिनमधे शिरा. तिथे लोखंडापासून व इलेक्ट्रीक (विद्युत) उपकरणांपासून दूर रहा. तसेच स्वत:चा विजेपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडायच्या आधी हवामानाचा अंदाज घ्या. हवामान अंदाज काय म्हणतो ते बघा. तसेच आकाशाचे निरीक्षण करा. आकाशांत खूप काळे ढग असल्यास व दूरवरून वीज कडाडण्याचा आवाज येत असल्यास घराबाहेर पडू नका. आकाशात वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना टी.व्ही. बंद ठेवा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. एरीयल असल्यास एरियल काढून ठेवा. कारण एरियल किंवा विजेच्या तारांमधून ही कडाडणारी वीज शिरून टी. व्ही. (डॅमेज) नादुरुस्त, खराब करू शकते. कधी कधी हायवोल्टेजमुळे टी.व्ही. जळून आगपण लागू शकते; कंम्प्यूटर बंद ठेवा; फ्रिज बंद ठेवा. शक्यतो विजेच्या सर्व महागडय़ा वस्तू बंद ठेवा व त्यांचे प्लग सॉकेट मधून काढून ठेवा.
अनंत ताम्हणे
(अभियंता व ऊर्जा अभ्यासक)
पावसाळ्यात विजांपासून बचाव
पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2013 at 08:58 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid electric mishap in rainy season