केळीच्या बागेवर प्रभावी वापर
द सेंट्रल टय़ुबर क्रॉप्स रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने भाज्या व फळांवर पडणाऱ्या किडीचा मुकाबला करणारे जैविक कीडनाशक तयार केले असून, त्याचा उपयोग अतिशय प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आले आहे. या कीडनाशकाचा पहिला उपयोग केळीच्या बागेवर केला असता तेथे केळाच्या रोपांना कीड लागली नाही. यामुळे रासायनिक कीडनाशकांच्या घातक परिणामांना आता तोंड द्यावे लागणार नाही. जगभरात सेंद्रिय कृषी उत्पादनांना मागणी असताना आता जैविक कीडनाशके वापरणे जास्त योग्य आहे असे मत या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.
पीक संरक्षण विभागातील प्रमुख वैज्ञानिक डॉ. सी. ए. जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली हे नवीन कीडनाशक तयार केले आहे. कॅसावा म्हणजे टॅपिओकामधील कीडनाशक घटक आम्ही पाने व कंदापासून वेगळे केले आहेत. त्यापासून हे जैविक कीडनाशक तयार केले असून पिकांना नष्ट करणाऱ्या कीटक व किडय़ांपासून ते संरक्षण करते.
टॅपिओका हे कंद वर्गातील पीक असून किमान ८० देशांत त्याचा वापर पूरक अन्न म्हणून केला जातो. प्रत्येक हंगामानंतर कॅसावाची पाने (५ ते ७ टन हेक्टरी), कंद (१५ ते २३ टक्के) असा जैवभार तयार होतो. कॅसावा म्हणजे टॅपिओकाची पाने ही प्रथिने व इतर पोषकांचा उत्तम स्रोत आहे. या जैवकीडनाशकांचा वापर केळी व इतर फळझाडांवर पडणाऱ्या फळे पोखरणाऱ्या किडींचा व अळय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी होतो.
केरळातील तिरुअनंतपूरम, मल्लपूरम व कसरगोड या जिल्हय़ात किमान ३० हजार केळी रोपे अशा पद्धतीने वाढवण्यात आली, त्यांना जैवकीडनाशक देण्यात आले व आता केळीचे पीक चांगले आले आहे. शिवाय ते कीडमुक्त आहे.
प्रतिनिधी
जैविक कीडनाशकाची निर्मिती
केळीच्या बागेवर प्रभावी वापर द सेंट्रल टय़ुबर क्रॉप्स रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने भाज्या व फळांवर पडणाऱ्या किडीचा मुकाबला करणारे जैविक कीडनाशक तयार केले असून, त्याचा उपयोग अतिशय प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आले आहे.
आणखी वाचा
First published on: 11-06-2013 at 09:13 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biotic pest killers production