पक्षाघाताच्या झटक्यात किंवा मेंदूच्या इतर विकारात मेंदूचे अवयवावरील नियंत्रण जेव्हा जाते तेव्हा रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो आणि मदतनिसाशिवाय तो असहाय होतो. पण आजच्या प्रगत संगणकशास्त्राने ही उणीव यशस्वीपणे दूर केली आहे. शास्त्रज्ञांनी संगणकाला थेट मेंदूशी जोडून दिले आहे. संगणक हा आज्ञाधारी सेवकाप्रमाणे रुग्णाच्या इच्छा ग्रहण करून त्याचे आज्ञेत रूपांतर करण्यात यशस्वी होतो आहे. त्यामुळे कृत्रिम अवयवांचा स्वतंत्रपणे वापर करून रुग्ण आत्मनिर्भर बनू लागला आहे.
सध्याच्या संशोधनात मेंदूतील विचार पारदर्शीपणे जाणून घेण्याची यंत्रणा तयार झाली आहे. त्यासाठी रुग्णाच्या विद्युत मज्जा आलेखाचा (इ इ जी) आणि मेंदूच्या एमआरआय तंत्राचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. या दोन तंत्रातून मिळणाऱ्या मेंदूतील विचारांचे संग्रहण संगणकातर्फे करण्यात येत आहे. त्यातून अवयवांकडून क्रिया करण्याच्या आज्ञाही संगणकामार्फत दिल्या जात आहे. नवीन प्रयोग केवळ रुग्णांवर होत नसून सामान्य व्यक्तीही आपल्या मेंदूच्या इच्छा कशा कृतीत उतरवतात हे आश्चर्यकारकरीत्या दाखवण्यात येत आहे.
नुकत्याच केलेल्या एका संशोधनात वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी अपस्माराच्या रुग्णांकडून केवळ इच्छेद्वारे कृत्रिम अवयवांच्या हालचाली घडवून आणल्या. या संशोधन प्रकल्पाचे मुख्य संशोधक होते राजेश राव जे संगणकशास्त्राचे आणि अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या निरीक्षणाप्रमाणे मेंदूच्या इच्छेने कृत्रिम अवयवाचा वापर जसा वारंवार घडत जातो तसतसे पुढे त्या हालचाली प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या घडू लागतात. राजेश रावांखेरीज जेफ्रे ओजेमान आणि जेरेमी वँडर या तीन संशोधकांनी आपल्या प्रयोगाची माहिती अमेरिकेच्या प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस या पत्रिकेत प्रकाशित केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा