जसे जसे रशिया, अमेरिका किंवा युरोपीय देशांच्या अवकाश मोहिमांना यश मिळू लागले तेव्हा चंद्रानंतर मंगळाच्या दिशेने मोहीम पाठवण्याचे विचार हळू हळू मूर्त स्वरूप घेऊ लागले. पण त्याच बरोबर शास्त्रज्ञांचे वेगवेगळे गट आपापल्या आवडीच्या क्षेत्रात नवीन नवीन प्रकल्प सुचवू लागले होते. या मोहिमांना सरकार कडून मिळणारे अनुदान मात्र असीमित असण्याच कारणच नव्हतं. प्रत्येक वेळी ठराविक बजेट मध्ये कुठल्या मोहिमेला प्राधान्य द्यावं यावर विचार मंथंन होतं. कधी कधी असं ही होतं की एखाद्या प्रकल्पाला आधी हिरवा कंदिल दाखवण्यात येतो पण नंतर बजेट कमी पडल्या मुळे त्या मोहिमेला पूर्ण विराम किंवा स्वल्प विरामाला सामोरं जावं लागतं. आणि प्रत्येक प्रकल्प मांडताना त्या प्रकाल्पाचे शास्त्रीय महत्व आणि लागणारा खर्च या दोघांची सांगड घालावीच लागते.  काही तर मागे पडण्याची शक्यता देखील असू शकते, म्हणून शास्त्रज्ञ फार जपून आणि विचारपूर्वक या मोहिमा आखतात. तर कधी कधी एका मोहिमेतून दुसरं वेगळं उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात.
आता मंगळावर काय किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावर अंतराळयान उतरवायचं म्हणजे त्या ग्रहाच्या पृष्ठभागाची आणि त्या ग्रहाच्या वातावरणाची माहिती पण आपल्याला हवीच. तर अशा मोहिमा तीन टप्प्यात साध्य होतात.
पहिला टप्पा म्हणजे फ्लाय बाय – जाता जाता हे ही बघून जा प्रकाराची – म्हणजे मुंबई हून नागपूरला विमानाने जाणाऱ्याला जाताना वाटेत उजव्या बाजूस लोणार सरोवराचे विवर दिसते ते बघा. ( बुलढाणा जिल्यातील लोणार सरोवर हे अशनी पडल्याने तयार झालेल्या विवरात पाणी साचून तयार झालेले आहे).
दुसरा टप्पा म्हणजे ऑरबायटर – आता त्या ग्रहा भोवती परिक्रमा करून त्याची निरीक्षणे घेऊन यान उतरवण्यासाठी नेमकी कुठली जागा योग्य आहे हे ठरवणं – प्रत्यक्ष विमानाने लोणारचे हवाई सर्वेक्षण करणे. आणि मग शेवटी लॅण्डर – म्हणजे यान ठरवलेल्या जागी उतरवणं.
ग्रहांच्या बाबतीत आपल्या समोर आणखी एक मुद्दा समोर येतो. ग्रह हे सूर्याची परिक्रमा करतात. त्यामुळे त्यांच्यातील अंतरे सारखी बदलत असतात. दोन ग्रहातील अंतर वाढत जातं मग ते त्याच्या कमाल िबदू पर्यंत पोचतं आणि मग ते अंतर त्याच्या किमान िबदू वर पोचत परत कमी कमी होतं . त्याच्या पलिकडे आणखी एक बाब येते ती म्हणजे ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे – पूर्ण गोलाकार नाही. त्यामुळे दोन ग्रहातील कमाल आणि किमान अंतर सुद्धा बदलत असतं. त्यामुळे जर कमीत कमी खर्चात एखाद्या ग्रहाच्या दिशेने जायचं असेल, काही विशिष्ट कालावधीत अंतराळयान पाठवलं तरच ती मोहीम फत्ते होऊ शकते. अशा या कालावधीला लाँच िवडो म्हणतात. ग्रहाच्या कशाला पण अगदी अंतराळ स्थानकाला भेट देणाऱ्या यानांच्या उड्डाणा साठी लाँच िवडो असतात.  काही करणाने एखादा कालावधी चुकला तर पुढच्या कालावधीची वाट बघावी लागते.
पृथ्वीला सूर्याची एक परिक्रमा करण्यास ३६५ दिवस लागतात तर मंगळाला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यास  ६८७ दिवस लागतात. आणि पृथ्वी आणि मंगळ दोघेही आपापल्या कक्षेत फिरत असल्यामुळे दर ७८० दिवसांनी (सुमारे २ वर्ष २ महिने) मंगळ पृथ्वी आण सूर्य सुमारे एकाच रेषेत येतात. याचा अर्थ मंगळ आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी असतं. आणि हा कालावधी मंगळाच्या दिशेनं यान पाठवण्याकरता योग्य मानला जातो. पण वर सांगितल्या प्रमाणे या ग्रहांच्या कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे दर १६ वर्षांनी एक कालावधी असा येतो की पृथ्वी आपल्या कक्षेत सूर्यापासून सर्वात दूर अंतरावर असते तर मंगळ सर्वात कमी. असा कालावधी तर फारच उत्तम. असा कालावधी १९८६ ते १९८८ आणि मग  २००२ –  २००४ च्या सुमारास होता. तुम्हाला कदाचित आठवतं असेल की २०३३ च्या ऑगस्ट महिन्यात मंगळ चंद्रा एवढा मोठा दिसेल अशी अफवा होती. येत्या काही वर्षांत या काही लाँच िवडो आहेत – पहिली या वर्षी नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ मध्ये आहे. त्या नंतर मंगळावर मोहीम आपल्याला  जानेवारी.२०१६ ते एप्रिल २०१६ ही लाँच िवडो मिळेल. लाँचिवडो (अनुकूल उड्डाण कालावधी) हा शब्द आता प्रसिद्धी माध्यमात पण रूढ झाला आहे. तुम्हाला एखादा सिनेमा प्रथम प्रदíशत करायचा असेल तर तुमच्यासाठी त्या सिनेमाची लाँचिवडो  उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुटय़ांची असेल. तसेच अंतराळ मोहिमांसाठीसुद्धा हा अनुकूलता कालावधी वरील निकषांच्या आधारे ठरवला जातो.
(लेखक हे मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक आहेत.)
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा  rajendra.yeolekar@expressindia.com