कच्चे तेल, ऊर्जा याविषयी आपण जी चर्चा करतो, ऐकतो तीही त्याच्या कमतरतेविषयी तीही वर्षांतून केव्हाही पण अजून एक महत्त्वाचा घटक जो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो म्हणजे- पाणी. याबद्दल मात्र उन्हाळा किंवा पावसाळा आला आणि काही आपत्ती ओढवली की आपल्याला आठवण होते खरचं ना! असे का होते? त्याचा मात्र आपण विचार करीत नाही. खरेतर पाणी म्हणजे जीवन म्हणून म्हणतात ना! निसर्गाची करणी आणि नारळात पाणी. ज्या संस्कृती निर्माण झाल्या त्याही पाण्याभोवतीच त्याने तर मानवाच्या उत्पत्तीपासून ते आतापर्यंतच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसेच सरकारने पाणी उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण पाहता पाण्याचे प्रश्न अतिउग्र होत आहेत. जगाची लोकसंख्या प्रतिवर्ष ८० लाखाने वाढत आहे. शुद्ध पाण्याची मागणीही ६४ कोटी चौरस मीटर प्रतिवर्ष वाढत आहे. २०५० पर्यंत ३ अब्ज लोक वाढतील त्यामध्ये ९० टक्के लोक हे विकसनशील देशातील असतील. अशारीतीने वेगवेगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपणास सज्ज राहावे लागेल. शुद्ध पाण्याशिवाय औद्योगिक उत्पादन, आíथक विकास, सामाजिक सुधारणा होऊ शकत नाही. कुपोषण, रोगराई, दुष्काळ, महापूर अशा आपत्तीमुळे देशाचा विकासदर नक्कीच कमी होतो. अशा समस्या येऊ नयेत किंवा आल्या तर त्याचे निराकरण कसे करावे त्यासाठी काय करणे अपेक्षित आहे? त्यात कोणाचा सहभाग असणे आवश्यक आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. याचसाठी २०१३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पाणी सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. २२ मार्च हा दिवस जागतिक पाणी दिवस, तर १ ते ६ सप्टेंबर हा पाणी सहकार्य आठवडा म्हणून साजरा केला जाणार आहे.
पाणी हे प्रत्येक क्षेत्रात लागतेच. जसे की आद्योगिक क्षेत्रात विविध कारखान्यात विपूल प्रमाणात पाणी लागते. शेती तर पाण्याशिवाय होऊच शकत नाही. आपल्या रोजच्या जीवनातही पाणी लागतेच. ऊर्जा क्षेत्रात जलविद्युत, औष्णिक आणि आण्विक प्रकल्पात याचा उपयोग होतो. निसर्ग आणि पाण्याचं नातं अतूट आहे. असे एकही क्षेत्र नाही की जे पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकते. यामधील एकही घटक गळून गेला तर मानवाची प्रगती तर लांबच अस्तित्वही धोक्यात येईल. वातावरणातील बदल ही जेवढी चिंताजनक बाब आहे तेवढीच पाणीही आहे. याची जाणीव सर्वाना करून देणे महत्त्वाचे आहे. बरेचसे देश नेसíगक आपत्तींना तोंड देताना दिसतात तरीही त्यांचा विकासदर कमी होत नाही. काही देशासमोर वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, आरोग्य, महागाई अशा अडचणी असूनही अर्थव्यवस्था बळकट करतात याचे मूळ कशात आहे हे समजले तर आपणही प्रगती साधू शकतो. याचे मूळ हे पाणी व्यवस्थापनात आहे. पाण्याचे व्यवस्थापन केले म्हणजे झाले असे नाही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची तरतूद करणे. ते कोणाच्या मार्फत राबवले जाणार याचेही नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक ते जागतिक स्तरावर पाण्याच्या स्रोताविषयी अडचणी आहेत. त्या शांततेच्या मार्गातून सोडविल्या तर नक्कीच सक्षम देश बनेल. १९६० मध्ये सिंधू पाणी करार झाल्यामुळे जलसंधारणाचे नियोजन झाले. त्यातूनच शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत मिळाली. थरच्या वाळवंटात इंदिरा गांधी कालवा केल्याने वाळवंटातही शेती होऊ लागली. नदीजोड प्रकल्प केला तर जेथे दुष्काळ आहे तेथे पाणी पोहचेल आणि ज्या प्रदेशात महापुराने थमान घातले आहे असे होणार नाही.
पाण्याचे व्यवस्थापन हे स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर करणे गरजेचे आहे. पाण्याचा नसíगक स्रोत जो आहे त्यावर अवलंबून असलेल्या लोकसंख्या, शेती व कारखाने यांची प्रतिदिनी पाण्याची मागणी घेणे त्यानुसार असलेल्या पाण्याचे वर्षभर पुरेल असे नियोजन करणे. ज्या भागात पाऊस कमी पडतो तेथे नदी जोड प्रकल्प राबवून शेतीचे उत्पादन वाढवणे. त्यामध्ये सरकारी यंत्रणा, आंतरराष्ट्रीय संस्था, खासगी क्षेत्रातील सामाजिक संस्था व नोकरशाही यांचा सहभाग करून घ्यावयास हवे. या संदर्भात निर्णय घेताना नसíगक स्रोताचा ऱ्हास तर होत नाही ना याचा विचार नक्कीच करावा. स्वत:हून सहभागी होण्यासाठी मुक्त चर्चासत्रे घेऊन प्रयोगशील विचारास वाव द्यावा त्यातून पाण्याचे फायदे त्याचे नियोजन तसेच कृतिशील आराखडे तयार करावे. ते पूर्णत्वास नेण्यास कटिबद्ध राहावे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन असेल तर दुष्काळ व महापूर अशा नसíगक आपत्ती उद्भवू शकत नाही. समाजातील प्रत्येक घटकाला पाणी सहकार्य करण्यासाठी सहभागी करून घेणे त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. संभाषणाचे माध्यम म्हणून दूरदर्शन, वृत्तपत्र, मासिके यांचा अगत्याने वापर करणे आवश्यक आहे. आपलं भविष्य जर सुरक्षित करावयाचे असेल तर पाणी व्यवस्थापन केलेच पाहिजे.
पाणी सहकार्य वर्ष साजरे करण्यामागे प्रमुख उद्दिष्टे
१. देशामध्ये आणि वेगवेगळ्या समूहात पाण्याविषयी सहकार्य करणे व त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधणे.
२. देशामध्ये व समूहात पाण्याच्या स्रोताविषयी जे वादविवाद असतील ते सामोपचाराने चच्रेच्या माध्यमातून सोडवणे.
३. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाण्यासंबंधी कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.
४. पाणी व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सर्वाचा सहभाग वाढविणे.
५. सर्वसामान्य लोकांचा पाण्याविषयीच्या दृष्टिकोनात बदल करणे.
६. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे.
* पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याने व्यापलेला भाग जास्त म्हणजे ७० टक्के
* पाणी हवेतही बाष्पाच्या रूपात असते.
* पृथ्वीवर ९७ टक्के पाणी महासागरांमध्ये आहे. दोन टक्के पाणी गोठलेल्या रूपात आहे.
* एकूण पाण्याच्या एक टक्क्य़ाहून कमी पाणी पिण्यायोग्य आहे.
* आपल्या शरीरात ६६ टक्के पाणी असते.
* ज्या पाण्यात खनिजांचे प्रमाण जास्त असते त्याला कठीण पाणी म्हणतात, त्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम ही खनिजे जास्त असतात.
विकसनशील देशातच जास्त असेल पाणीटंचाई
कच्चे तेल, ऊर्जा याविषयी आपण जी चर्चा करतो, ऐकतो तीही त्याच्या कमतरतेविषयी तीही वर्षांतून केव्हाही पण अजून एक महत्त्वाचा घटक जो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो म्हणजे- पाणी. याबद्दल मात्र उन्हाळा किंवा पावसाळा आला आणि काही आपत्ती ओढवली की आपल्याला आठवण होते खरचं ना! असे का होते? त्याचा मात्र आपण विचार करीत नाही.
First published on: 19-03-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Developing countries face serious water shortages