वाढत्या लोकसंख्येप्रमाणेच बिकट अर्थव्यवस्था, महागाई, अन्नाची मागणी हेही देशासमोरील आव्हानच आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य दिशेने वापर केला तरच देशातील अन्नाची समस्या सुटणार आहे. अणुऊर्जा म्हटली, की जी भीती बळावते त्याहीपेक्षा त्याचा योग्यरीतीने वापर केला तर प्रत्येक क्षेत्रात त्याचा फायदा होऊ शकतो. १८९५ मध्ये ‘क्ष’ किरणांचा शोध लागला, त्याचा वापर वैद्यकीय क्षेत्रात होऊ लागला. ज्या नसíगक प्रारणांची आपणास भीती वाटते ते फार वर्षांपासून अस्तित्वात आहेत. १९३४ मध्ये पहिल्यांदा कृत्रिमरीत्या किरणोत्सारी पदार्थ तयार केला. त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी विज्ञान, संशोधन, उद्योग, पर्यावरण संरक्षण, चिकित्साबरोबरच कृषी क्षेत्रातही होऊ लागला. आपण किरणोत्सारी विश्वात राहतो. आपल्या हाडात किरणोत्सारी पोलोनियम आणि रेडियम असतात. आपल्या मांसपेशीमध्ये किरणोत्सारी कार्बन आणि पोटॅशियम असून फुफ्फुसात ट्रिशियम (ळ१्र२ँ्र४े) असतो. अवकाशातून निरंतर वैश्विक प्रारणे येत असतात. जे आपण खातो- पितो त्या वस्तूंमध्येही प्रारणे असतात. पण त्याची तीव्रता नगण्य असल्याने त्याचा आपल्यास धोका नसतो.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी उत्पादन झाल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची सोय अजूनही शेतकऱ्यास म्हणावी तेवढी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शेतकरी शेतातून आलेल्या मालाला भाव येईपर्यंत वाट पाहू शकत नाही. तसेच, त्याच्या पिकांवर कर्ज असल्याने तो पटकन माल विकतो. परिणामी योग्य तो भाव मिळत नाही. त्यातही भाजीपाला, फळे हे जास्त काळ टिकत नसल्याने त्याची नासाडी अधिक होते.
भाजीपाला ग्राहकांना मिळेपर्यंत २० ते ३० टक्के खराब होतो. तसेच, बटाटा, लसूण आणि कांदा हे कमी तापमानास व आद्र्रतायुक्त वातावरणात त्यास कोंब येतात. टोमॅटो, केळी व काही फळे हे ग्राहकापर्यंत पोचण्याच्या अगोदरच पिकून खराब होऊ लागतात. ही नासाडी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अन्नावर अथवा आतमध्ये कृमी, कीटक यांची पदास होणे होय. ग्राहकांना सुरक्षित अन्न, शेतकऱ्यास योग्य तो भाव आणि कमीत कमी नासाडी व्हावयाची असल्यास प्रारण प्रक्रिया पद्धतीचा वापर करणे हे कृषिक्षेत्रास वरदान ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय निर्यात धोरणानुसार अन्न आणि त्याचे पदार्थ निर्यात करताना ते शुद्ध, र्निजतुक असावयास हवे. तसेच तो उच्च प्रतीचा माल असणे आवश्यक असते. हे सर्व करताना रासायनिक पद्धती आणि उन्हात किंवा भट्टीत वाळवणे ह्या भौतिक पद्धती वापरल्या जातात. अशा पारंपरिक प्रकारापेक्षा प्रारणांचा वापर करणे हे केव्हाही सुरक्षित, र्निजतुक व अतिउत्तम आहे.
हे तंत्रज्ञान सुरक्षित आहे का, अशी भीती बाळगणे चुकीचे आहे. योग्यरीतीने त्याचा वापर केला तर मानवास आणि वातावरणास अपायकारक नाही. कृषी उत्पादनांवर कमी तरंग लांबीचे गॅमा, इलेक्ट्रॉन आणि क्ष किरणे याचा मारा केला जातो त्यास ‘डोस’ म्हणतात. ते डॉ. राल्फ सिवर्ट (र्री५ी१३) यांच्या नावावर ‘सिवर्ट’ मध्ये व्यक्त केले जाते. सिवर्ट हे मोठे एकक असल्याने ते मिलि सिवर्टमध्ये वापरले जाते. प्रत्येक व्यक्तीला निसर्गातून १ ते २ मिली सिवर्ट एवढा डोस प्रतीवर्ष मिळतो. घरामध्ये रेडॉन वायू असल्याने १ ते ३ मिली सिवर्ट एवढा डोस प्रतीवर्ष मिळतो. काही घरामध्ये तर याच्यापेक्षाही दहा ते शंभर पटीने जास्त असतो. प्रारणांचा वापर करताना कडक सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक असते. तसेच प्रारण याविषयी योग्य माहिती नसल्याने गरसमजुती वाढू शकतात.
भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई आणि संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फूड पॅकेजिंग करण्यासाठी प्रारण प्रक्रिया केंद्र चालू केले आहे.
व्यावसायिक तत्त्वावर पहिल्यांदा प्रारण प्रक्रिया केंद्र ‘कृषक’ (कृषी उत्पादन संरक्षण केंद्र) हे जुल २००३ मध्ये लासलगाव (जिल्हा नाशिक) येथे चालू झाले. येथे प्रतिदिनी १० टन कांद्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच, व्यावसायिक प्रारणाची सुविधा वाशी, नवी मुंबई येथे ब्रिट (बोर्ड अॉफ रेडिएशन अॅन्ड आयसोटोप टेक्नोलॉजी) यांनी दिली आहे. तिथे प्रतिदिनी २० टन मसाले, कांदे यावर प्रारणांच्या साह्याने र्निजतुक करतात. तसेच भाभा अणुसंशोधन केंद्रात १० टन प्रति तास या दराने कांदे आणि बटाटे यांचे र्निजतुकीकरण केले जाते. गेल्या महिन्यात आंब्याची निर्यात करण्यापूर्वी प्रारणांच्या साह्याने र्निजतुकीकरण केले गेले होते.
भाभा अणुसंशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ यांनी प्रारणांच्या साह्याने जवळपास १५०० पेक्षा अधिक नवीन खाद्यान्नांच्या जाती आणि वनस्पतीची रोपे तयार केली आहेत. अशा नव्या जातीमुळे अन्नाचे उत्पादन वाढत आहे. ह्या जाती विशेषत अति पाऊस, थंडी सहन करू शकतात.
एवढेच नाही, तर कृमी, कीटक यांच्या वाढीस प्रतिरोध करतात. २००६ पर्यंत ह्या संस्थेने जास्त उत्पादन देणाऱ्या २६ जातीचे वाण विकसित केले आहे. शेंगाच्या १० जाती, डाळीच्या ११ आणि राईच्या २ जाती विकसित केल्या आहेत. तसेच जूट, तांदूळ आणि सोयाबीन यांचे प्रत्येकी एक वाण तयार केले आहे. अशा रीतीने भाभा अणुसंशोधन केंद्राचा कृषी क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे कडधान्ये, डाळी, भाजीपाला, मांस आणि समुद्री अन्न यांचे र्निजतुकीकरण करून त्याची गुणवत्ता वाढवणे जेणेकरून निर्यातीस प्रोत्साहन मिळेल, यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र प्रयत्न करीत आहे.
भाभा अणुसंशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ यांनी प्रारणांच्या साह्याने जवळपास १५०० पेक्षा अधिक नवीन खाद्यान्नांच्या जाती आणि वनस्पतीची रोपे तयार केली आहेत. अशा नव्या जातीमुळे अन्नाचे उत्पादन वाढत आहे. ह्या जाती विशेषत अति पाऊस, थंडी सहन करू शकतात. एवढेच नाही, तर कृमी, कीटक यांच्या वाढीस प्रतिरोध करतात. २००६ पर्यंत ह्या संस्थेने जास्त उत्पादन देणाऱ्या २६ जातीचे वाण विकसित केले आहे.
‘प्रारण’ पद्धतीचे फायदे
१ प्रारणे हे अन्नपदार्थावर विषारी अंश सोडत नाहीत.
२ प्रारणांच्या साह्याने अन्न र्निजतुक होऊन त्याचा ताजेपणा आणि दर्जा सुस्थितीत राहतो.
३ गॅमा प्रारणांची भेदक क्षमता अधिक असल्याने ते अन्नाच्या आतील व बाहेरील भागावरील कृमी, कीटक, अळी यांना मारून टाकते, त्यामुळे अन्न खराब होत नाही.
४ प्रारणांचा अन्नातील जीवनसत्त्वावर आणि खानिजावर काहीही परिणाम न होता सुस्थितीत राहतात.
५ प्रारणे ही भौतिकीय प्रक्रिया असल्याने भाजीपाला, फळे आणि मसाले यांच्या र्निजतुकीकरण करण्यासाठी वापरतात.