वनस्पतींना संवेदना असतात असं पहिल्यांदा भारतीय वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं होतं. आता नवीन संशोधनानुसार वनस्पतींना मेंदू नसला तरी स्मृती असल्याचं दिसून आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सेंटर फॉर इव्होल्यूशनरी बायॉलॉजी या संस्थेच्या संशोधिका डॉ. मोनिका गॅगलियानो यांनी लावलेल्या शोधानुसार वनस्पतींना स्मृती असते व त्या अनेक बाबी शिकू शकतात. गॅगलियानो व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राण्यांना शिकवल्या जाणाऱ्या प्रतिसादांची चाचणी त्यांच्या प्रयोगात वापरली. त्यांनी मिमोसा पुडिका या वनस्पतीला कमी व जास्त प्रकाश अशा दोन टोकाच्या पर्यावरण स्थितीत प्रतिसाद कसा असावा याचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी या वनस्पतीवर पाणी शिंपडण्यासाठी खास उपकरणे वापरण्यात आली होती. पाण्याचे थेंब पडल्यानंतर मिमोसा ही वनस्पती तिची पाने मिटून घेते. त्यांच्या मते मिमोसा वनस्पतीनं तिला वास्तव धोका नसतानाही केवळ सततच्या अडथळ्यामुळे पाने मिटून घेण्याची कृती केली. मिमोसा वनस्पती या प्राण्यांप्रमाणे काही सेकंदात वर्तनात्मक कृती शिकतात. उलट कमी प्रकाशासारख्या प्रतिकूल स्थितीत त्यांची शिकण्याची प्रक्रिया जास्त वेगवान असते. विशेष म्हणजे वनस्पती काही आठवडय़ांनीही पर्यावरण स्थिती बदलल्यानंतरही काही बाबी लक्षात ठेवतात. या संशोधनामुळे वनस्पतींच्या आपल्या अभ्यासात मोठी भर पडणार आहे. आपण स्मृतीच्या मदतीनं शिकतो पण वनस्पती मेंदू नसतानाही शिकतात. चेतासंस्था असलेले प्राणी स्मृती धारण करतात व त्यामुळे ते पूर्वानुभवातून शिकू शकतात. त्यामुळे आपली शिकण्याची व्याख्या बदलू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा