अवकाश संशोधनातील स्पर्धा
२०१३ या वर्षांत भारत व चीन यांच्यात अवकाश संशोधनातील स्पर्धा कायम राहिली. चीनने चंद्राचे लक्ष्य ठेवले तर भारताने मंगळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे ‘मावेन’ हे अंतराळयानही मंगळाकडे भारताच्या पाठोपाठ रवाना झाले. २०१४ मध्ये भारत व अमेरिका यांची अंतराळयाने मंगळाच्या कक्षेत साधारणपणे काही कालावधीच्या अंतराने पोहोचतील. मंगळावर जीवसृष्टीस पोषक स्थिती आहे किंवा नाही हे या मोहिमांमुळे समजू शकेल. मंगळावर अमेरिकेची यंत्रमानवसदृश गाडी तेथील खडक कोरून खनिजद्रव्यांची व भूगर्भाची माहिती घेत आहे त्यात आणखी भर पडेल. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाची खरी कसोटी जीएसएलव्हीच्या शनिवारच्या प्रक्षेपणात आहे. नेदरलँडसचे उद्योगपती लॅन्सडॉर्प यांनी मार्सवन ही जी योजना जाहीर केली होती, त्यासाठी १००० जणांची निवड झाली असून त्यात ६२ भारतीयांचा समावेश आहे. अर्थातच हा मंगळ दौरा परत न येण्याच्या बोलीवर आहे. मंगळावर वस्ती करण्याच्या मोहिमेत २०२४ मध्ये काही जणांना या योजनेत मंगळावर पाठवले जाणार आहे.
रोसेटा मोहीम
विशेष म्हणजे युरोपने दहा वर्षांपूर्वी सोडलेले रोसेटा यान ६७ पी- चुरयुमोव-गेरासिमेन्को या धूमकेतूचा वेध
कृष्णद्रव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न
आपल्या विश्वाचा अंदाजे एकचतुर्थाश भाग हा कृष्णद्रव्याने व्यापलेला आहे, त्यामुळे या द्रव्याचे कण शोधण्यासाठी एक प्रयोग केला जाणार असून, दक्षिण डाकोटातील सोन्याच्या खाणीत अगदी तळाशी
चार मितींमध्ये मुद्रण
गेल्या वर्षी त्रिमिती मुद्रकाच्या क्षेत्रात बरेच संशोधन झाले. या वर्षी चार मितींचे मुद्रण अपेक्षित असून,
‘सर्न’ची साठ वर्षे
हिग्ज बोसॉन म्हणजेच देवकणाचा शोध घेणाऱ्या सर्न या प्रयोगशाळेला साठ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त युनेस्कोने पॅरिस येथे खास कार्यक्रम आयोजित केले आहेत. असे असले तरी २०१५पर्यंत ‘सर्न’मधील लार्ज हायड्रॉन कोलायडर हे महाकाय त्वरणक यंत्र बंद राहणार असल्याने संशोधनाच्या पातळीवर मोठी बातमी तेथून अपेक्षित नाही.
स्फटिकशास्त्र वर्षांच्या निमित्ताने..
२०१४ हे आंतरराष्ट्रीय स्फटिकशास्त्र वर्ष आहे. या विज्ञान शाखेनेच आपल्याला डीएनएची गुपिते शोधण्यास
अन्नसुरक्षा
वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवायचे कुठून, या प्रश्नावर सध्या जनुकसंस्कारित पिके हा एक मार्ग सांगितला
हवामान बदल
जीवाश्म इंधनांच्या वाढत्या वापरामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढून पृथ्वीचे तापमान वाढते आहे. त्यावर
विज्ञानवेध २०१४
२०१३ या वर्षांत भारत व चीन यांच्यात अवकाश संशोधनातील स्पर्धा कायम राहिली. चीनने चंद्राचे लक्ष्य ठेवले तर भारताने मंगळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-01-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science descry