कार्पोरेट्सचा अधाशीपणा, नफेखोरी व आक्रमक मार्केटिंग आणि उद्योगविश्वात रूढ होत असलेले बिल् गेट्स मॉडेल नवीन सॉफ्टवेर अ‍ॅप्स शोधल्या शोधल्या  मायक्रोसॉफ्टला विकून पसे कमावण्याची पद्धत  इत्यादीमुळे बाजारात कुठलेही नवीन उत्पादन येण्यास प्रचंड वेळ लागतो.  बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क प्रस्थापित करून आपली खुंटी बळकट केल्याशिवाय एकही पाऊल पुढे ठेवता येत नाही. आपण शोधलेल्या उत्पादनात बाजारात उपलब्ध असलेल्या  वस्तूंचा वापर करत असल्यास त्यासाठीच्या पेटंट्सला वाटेकरी करून घेतल्याशिवाय  उत्पादन बाजारात आणता येत नाही. तरीसुद्धा एवढ्या जंजाळातून  सुटका करून घेतलेली नवीन नवीन उत्पादनं बाजारात येतात, नफा कमावतात, व त्यांना पर्यायी असे काहीतरी बाजारात आल्यास बघता बघता लुप्तही होतात. काही वेळा उत्पादनाला उठाव आहे हे लक्षात आल्यावर ग्रे मार्केटचे दलाल मूळ उत्पादकाला जीव नकोसा करून टाकतात.
परदेशात गाजलेली उत्पादनं आपल्या देशातील बाजारात पोचण्यास (मोबाइलसारख्या काही उत्पादनांचा अपवाद वगळता) किमान सात वर्ष तरी लागत असावीत.  श्रीमंत देशानी कंटाळा येऊन फेकून दिलेल्या वस्तू आपल्याकडे येतात  असे काही उत्पादनांच्याबाबतीत म्हणावेसे वाटते. याची कारणं शोधताना (श्रीमंतांना) परवडणारे, भारतीय मानसिकतेला पटणारे, दीर्घकाळ टिकणारे, दुरुस्त करता येऊ शकणारे, देखभालीची अट नसणारे  अशा आखुडिशगी, बहुदुधी म्हशीसारख्या  परस्पर विरोधी गुणधर्माची  अपेक्षा करणारे   तंत्रज्ञानच आपल्या येथे खपते. शिवाय मनुष्यबळ मुबलक प्रमाणात व स्वस्त आणि त्यांना गुलामासारखे रात्रंदिवस राबविण्याची कसबही आपल्यात असल्यामुळे वेळ व श्रम वाचविणारया सुविधा  परवडत असले तरी  नकोसे असतात. उदाहरणार्थ, डिश वॉिशग मशीन आपल्या देशात येऊच शकत नाही. ऑटोमॅटिक वॉिशग मशीनमधील कपडे वाळविणारया ड्रायरचाच वापर फक्त होत असतो. याचबरोबर तंत्रज्ञान सुविधेतील प्रत्येक घटकाला स्वस्त पर्याय  शोधण्याच्या मानसिकतेमुळे उल्हासनगर व लुधियानाची उत्पादनं बाजारपेठ  काबीज करत मोठय़ा प्रमाणात नफा कमावते. यांच्या जोडीला आता चिनी उत्पादनांची रेलचेलही वाढत आहे.
ही सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा जागतिकीकरणामुळे इतर देशात कुठल्या सोयी-सुविधा आहेत व त्या आपल्यासाठी कितपत उपयोगी आहेत याचा आढावा घेतल्यास काही सुविधा आपल्या देशात पुढील   वर्षांत येण्याची चिन्हे आहेत. अशाच काही तंत्रज्ञान सुविधांची थोडक्यात माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
स्मार्ट व्हीलचेअर
माइक िस्पडल  सालच्या त्या दिवशी ल्युटन एअरपोर्टवर विमानाची वाट बघत होता. त्याच्यासमोरून विशीतील एक स्मार्ट तरुण ओबड धोबड असलेल्या व्हीलचेअरवर बसून जात होता. िस्पडलला ती व्हीलचेअर काही आवडली नाही. तेथेच बसल्या बसल्या बोìडग पासच्या पाठीमागे  िस्पडल काही रेखाटने काढत त्याच्या मनातील व्हीलचेअरला आकार देऊ लागला. मुळात  आता व्यवहारात असलेल्या व्हीलचेअरच्या गुणदोषाबद्दल विचार न करता अत्याधुनिक व्हीलचेअर कसे असायला हवे ते आकृतीतून उतरवत होता. िस्पडलची स्वत:ची एक कंपनी होती. त्यातील टूल्सचा व स्वत:च्या अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून व्हीलचेअर कसे बनविता येईल याचाच विचार त्याच्या डोक्यात होता.
डोक्यातील विचार व कल्पना कागदावर उमटेपर्यंत  वर्ष गेली. ट्रेकायनेटिक हे ट्रेड मार्क व व्हीलचेअरच्या पेटंट्स हक्कासाठी त्यानी पेटंट्स कार्यालय गाठले. ४२ पानाचे टेक्स्ट व  पानभर आकृत्या असलेल्या अहवालावरून आपल्याला काय हवे आहे ते, पेटंट कार्यालयामधील त्या तज्ञाला कळेल अशी अपेक्षा तो करत होता.
 नवीन उत्पादनासाठीचा अहवाल पेटंट कार्यालयाला पाठवताना अहवालात उत्पादन कुठल्या कुठल्या समस्यावर मात करू शकते  याचा उल्लेख करावा लागतो. िस्पडल यांनी प्रचलित व्हीलचेअरमधील उणीवावर बोट ठेऊन त्याचे ट्रेकायनेटिक व्हीलचेअर उत्कृष्टपणे कसे काम करू शकते यावर अहवालात भर दिला होता. पारंपरिक व्हीलचेअरमध्ये मोठ्या आकाराची चाकं सीटच्या पाठीमागे असतात. व पुढील कॅस्टर व्हील्स व्हीलचेअरला फक्त दिशा देण्याचे काम करतात. या डिझाइनमुळे कच्च्या रस्त्यावर वा चढावावरर व्हीलचेअर पुढे नेण्यास जास्त श्रम घ्यावे लागतात.  िस्पडल हेच  डिझाइन उलटे करून मोठे चाक सीटच्या पुढे व कॅस्टर व्हील्स सीटच्या मागे लावणार होता. तरीसुद्धा या चार चाकी रचनेमुळे ओबडधोबड जमिनीवर व्हीलचेअरला  मिळाली नसती. म्हणूनच िस्पडल  एकाच चाकाची कॅस्टर व्हील वापरणार होता. तीन चाकामुळे असमतोल जमिनीवरसुद्धा  व्हीलचेअर स्थिर राहू शकते. परंतु तीन चाकी चेअरचा एक मोठा तोटा असतो. व्हीलचेअर सरळ रेषेत नेणे अवघड होऊन जाते. परंतु याच्या डिझाइनमध्ये  वापरून या अडचणीवर मात केली आहे.
या व्हीलचेअरच्या सीटसाठी कार्बन फायबर वापरल्यामुळे सीटच आघात शोषकाप्रमाणे काम करू शकते.  वेग नियंत्रणासाठी भक्कम ड्रम ब्रेक्सची सोय यात केलेली आहे. इतर व्हीलचेअरमध्ये वेिल्डगने  जोडणी केल्यामुळे व्हीलचेअरची घडीचे डिझाइन शक्य नव्हते. परंतु िस्पडलचे  नट  बोल्टचे डिझाइन असल्यामुळे घडी करून कारमध्ये ठेवणे सुलभ ठरले आहे. चाकांच्या टायरची जाडी जास्त ठेवल्यामुळे कच्या रस्त्यावर चेअर सुलभपणे जाऊ शकते. चेअरची रुंदी   पासून  करता येत असल्यामुळे लहान दरवाज्यातून जाणे शक्य झाले आहे. अशा प्रकारच्या व्हीलचेअर्स जागतिक बाजारात आलेले असून आपल्या येथेही त्या येण्याची शक्यता आहे. (क्रमश)

Story img Loader