आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हा एक संयुक्त प्रकल्प असून त्यात अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि काही युरोपीय देश सामील झाले आहेत. इ.स. २०२८ पर्यंत हे स्थानक पूर्ण क्षमतेनं काम करेल अशी अपेक्षा आहे.या स्थानकात असलेले अंतराळवीर आतापर्यंत १६२ वेळा अंतराळात ‘चालले’ आहेत आणि त्यांनी १०२१ तासांचा कालावधी या चालण्यात व्यतीत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या ‘नासा’मध्ये कार्यरत असलेली परंतु मूळ भारतीय असलेली सुनीता विल्यम्स नुकतीच भारतात येऊन गेली. ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात’ असतानाचे तिचे अनुभव ऐकताना आपल्याला अरबी भाषेत असलेल्या ‘सुरस आणि चमत्कारिक’ कथांची आठवण झाली. कुठे आहे हे अवकाश स्थानक? तेथे नेमकं काय काम चालतं? तेथे शून्य गुरुत्वाकर्षण कशामुळं निर्माण होतं,  असे अनेक प्रश्न यानिमित्तानं जिज्ञासू व्यक्तींच्या मनात उभे राहतात.
हे अवकाश स्थानक म्हणजे एक प्रकारचा कृत्रिम उपग्रहच आहे. तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३८० कि.मी. उंचीवरून पृथ्वीभोवती प्रचंड वेगानं प्रदक्षिणा घालतो आहे. या स्थानकाचा वेग इतका आहे की ते अवघ्या ९२ मिनिटात एक पृथ्वीप्रदक्षिणा पुरी करते. या स्थानकात एका वेळेस जास्तीत जास्त ६ अंतराळवीर राहू शकतात. हे स्थानक अवाढव्य म्हणता येईल अशा आकाराचं आहे. लांबी ७३ मी., रुंदी १०८ मी. तर उंची २० मी. साहजिकपणे त्याचं वजनही प्रचंड म्हणजे साडेचार लक्ष कि.ग्रॅ. एवढं आहे. या स्थानकाचा आकार सोबतच्या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे. हा आकार अगदी अनियमित स्वरूपाचा आहे.
त्यामुळं पृथ्वीवरून त्याचं उड्डाण कशा पद्धतीनं झालं असेल असा प्रश्न तुमच्यापुढं उभा राहील. अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्थानकाचे वेगवेगळे घटक वेगवेगळ्या वेळी अंतराळात सोडण्यात आले आणि त्यांची जुळणी अंतराळात म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३८० कि.मी. उंचीवर करण्यात आली! तंत्रज्ञानाची कमाल म्हणतात ती हीच. या स्थानकाचा पहिला घटक १९९८  साली अंतराळात सोडण्यात आला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर घटक सोडण्यात आले किंवा स्पेस शटलबरोबर तेथे पाठवण्यात आले. आजपर्यंत ३५ अवकाश मोहिमांमधून २०४ अंतराळवीरांनी या स्थानकात मुक्काम केला आहे. हे स्थानक रशियातल्या बैकानूर येथील अंतराळ तळावरून सोडण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ७७०० मीटर प्रतिसेकंद एवढय़ा प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरत असून ते २४ तासांत १६ प्रदक्षिणा पूर्ण करतं. साहजिकपणं तेथे असलेल्या अंतराळवीरांना २४ तासांत १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त बघायला मिळतात. म्हणजे जणू काही २४ तासांत त्यांचे १६ दिवस सामावलेले आहेत! कल्पनाही करता येणार नाही असा हा अनोखा प्रकार अनेक अंतराळवीरांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे! अर्थात त्यांचा दिनक्रम २४ तासांचा कालावधी लक्षात घेऊनच आखलेला असतो. परंतु या विचित्र परिस्थितीचा त्यांच्या शरीरावर आणि मनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळं त्यांना विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं.
या स्थानकात असलेले अंतराळवीर ‘हवेत पोहताना’ ची दृश्यं तुम्ही दूरचित्रवाणीवर नक्कीच बघितली असतील. ही गोष्ट घडण्याचं कारण म्हणजे या स्थानकात निर्माण होणारी वजनरहीत अवस्था. या ठिकाणी वस्तुमान आणि वजन यामध्ये असणारा फरक लक्षात घ्यायला हवा. स्थानकात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म-गुरुत्व  स्थितीमुळं वजनरहित अवस्था निर्माण होते. त्यामुळं अंतराळवीर नेहमीसारखा जमिनीवर चालू शकत नाही. फार काय साधं पाणीसुद्धा सहजपणे पिऊ शकत नाही. आपण आपले दैनंदिन व्यवहार पृथ्वीवर सहजपणे पार पाडू शकतो याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पृथ्वीचं पुरेसं गुरुत्वाकर्षण. हे आकर्षण नसतं तर आपली अवस्था या अंतराळवीरांसारखी झाली असती. या वजनरहित अवस्थेत राहिल्यामुळंसुद्धा अंतराळवीरांची शारीरिक / मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना याही दृष्टीनं खास प्रशिक्षण दिलं जातं.
या अवकाश स्थानकात असलेल्या अंतराळवीरांचा पृथ्वीशी उत्तम संपर्क असतो. ते फोनवरून आपल्या कुटुंबीयांशी / नियंत्रण केंद्राशी बोलू शकतात. सुनीता विल्यम्सनं तर पृथ्वीवरच्या एका मॅरेथॉन स्पर्धेत अंतराळात राहून भाग घेतला होता. शिवाय अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंतराळातून मतदानही केलं होतं!
आता प्रश्न असा विचारला जाईल की हा सगळा उपद्व्याप कशासाठी?
हे अवकाश स्थानक म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. सूक्ष्म गुरुत्व स्थिती असताना पदार्थाचे गुणधर्म कसे बदलतात, याचा अभ्यास तेथे केला जातो. अत्यंत शुद्ध स्वरूपातले स्फटिक तयार करण्यासाठीही या स्थानकाचा उपयोग केला जातो. सूक्ष्म गुरुत्वाचे मानवावर होणारे परिणाम हाही वैज्ञानिकांच्या कुतूहलाचा विषय आहे, कारण भविष्यात परग्रहावर जेथे गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे- वस्ती करण्याची वेळ आली तर या माहितीचा उपयोग होणार आहे.
याशिवाय जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांशी संबंधित प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत. या स्थानकात प्रदूषणविरहित वातावरण असल्याने अनेक औषधांची शुद्ध स्वरूपात निर्मिती करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही वर्षांत चंद्र, मंगळ, तसेच काही लघुग्रह यांच्या दिशेनं काही अंतराळयानं रवाना होणार आहेत. त्यांच्यासाठी एक ‘थांबा’ म्हणूनही या अवकाश स्थानकाचा उपयोग होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हा एक संयुक्त प्रकल्प असून त्यात अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि काही युरोपीय देश सामील झाले आहेत. इ.स. २०२८ पर्यंत हे स्थानक पूर्ण क्षमतेनं काम करेल अशी अपेक्षा आहे.
अंतराळात चालणं ही एकेकाळी कविकल्पना होती, पण या अवकाश स्थानकाममुळं ती प्रत्यक्षात आली आहे. या स्थानकात असलेले अंतराळवीर आतापर्यंत १६२ वेळा अंतराळात ‘चालले’ आहेत आणि त्यांनी १०२१ तासांचा कालावधी या चालण्यात व्यतीत केला आहे. यापुढचा काळ अंतराळ पर्यटनाचा असणार आहे आणि त्या पर्यटनातलं एक महत्त्वाचं ठिकाण ‘अवकाश-स्थानक’ असलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका!..