इलेक्ट्रॉनिक्सच्या शास्त्रात झपाटय़ाने प्रगती आणि बदल घडून येत असतात. अत्यंत कमी, सूक्ष्मतम आकार, जबरदस्त क्षमता, नावीन्य आणि वापरण्यास सहजता अशा गुणांना वाढविण्यासाठी उपयुक्त साधनांची निर्मिती करण्याकडे संशोधकांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. नोकिया, सॅमसंग, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट अशा जागतिक कंपन्यांमधील संशोधक नवनवीन निर्मिती करण्यात सदैव मग्न असतात.
कॅमेरा, मोबाईल, घडय़ाळ, प्रोसेसर्स यासारख्या साहित्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याकडे संशोधकांचा कल आहे. आता केवळ स्पर्श (टचस्क्रीन) पद्धतीने साहित्याचा वापर करण्याची पद्धत साकारली आहे.
स्मार्टफोन प्रकारच्या टेलिफोन्समध्ये आता अँड्रॉईड स्मार्टफोन्स लोकप्रिय आणि उपयुक्त ठरत आहेत. प्युअरव्ह्य़ू लुमिआ (लुमिआ २०१३) कॅमेरा आणि  मोबाईल यांचा दुहेरी फायदा सहजपणे उपलब्ध होतो. केवळ स्क्रीनला स्पर्श केल्याने कॅमेऱ्याच्या लेन्सचे कामही सहजपणे घडू शकते.
टचस्क्रीन, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स यांची उपयुक्तता आणि वापरण्याची सुलभता मायकोसॉफ्ट सॅमसंग कंपन्यांनी नवनिर्मिती करून जबरदस्त स्वरूपात लोकप्रिय केली आहे. मॅचबूक एअर या प्रकारचे उल्ट्राबूक्स अतिशय उपयुक्त ठरत आहेत.
दररोज नवनवीन सुधारित साहित्यांच्या मॉडेल्सच्या निर्मितीत एकच समस्या जाणवते व ती म्हणजे या उपकरणाच्या चार्जिगची. आता सौरशक्तीवर किंवा केवळ हाताळण्यामुळे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तंत्राचा वापर करून वायरलेस पद्धतीने चार्जिग करण्याच्या तंत्राकडे झपाटय़ाने संशोधन सुरू आहे. शक्य झाल्यास सौरऊर्जेचा वापर करून चार्जिग अस्तित्वात येऊ शकेल. पृष्ठीय तंत्रज्ञान (सरफेस टेक्नॉलॉजी) याचा वापर करून वायफाय मोबाईल, व्हायबर, गूगल, फेसबुक यासारख्या कंपन्या विशेष करून जपान, अमेरिका, जर्मनी, स्वीडन, फ्रान्स या देशांमध्ये प्रतिवर्षी नवनिर्मितीच्या स्पर्धेत हिरिरीने सहभागी होत आहेत.

Story img Loader