आपल्या पृथ्वीपासून १२७ प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका सूर्यासारख्या ताऱ्याभोवती सप्तग्रह सापडले आहेत, असे खगोलशास्त्रज्ञांनी आज सांगितले.
युरोपीय दक्षिण वेधशाळा म्हणजे इएसओच्या हार्पस या दुर्बिणीने ही सौरमाला शोधून काढली असून, त्यात पाच ग्रह आहेत. या ताऱ्याचे नाव एचडी १०१८० असे आहे. तेथे आणखी दोन ग्रह आहेत, पण अजून त्यांचे अस्तित्व लक्षात आले नाही, त्यातील एकाचे वस्तुमान खूप कमी असण्याची शक्यता आहे.
खगोलवैज्ञानिकांनी हार्पस वर्णपंक्तिमापी युरोपीय अवकाश संस्थेच्या चिलीतील ला सिला येथील ३.६ मीटर दुर्बिणीला जोडून सहा वर्षे संशोधन करून १२७ प्रकाशवर्षे दूर असलेली वासुकी तारकापुंजातील ही ग्रहमाला या दुर्बिणीला मातृ ताऱ्याच्या पुढेमागे होणाऱ्या हालचाली समजल्या व त्या या पाच किंवा जास्त ताऱ्यांमुळे होत आहेत, हे लक्षात आले. पाच महत्त्वाच्या ग्रहांकडून ठोस संदेश प्राप्त झाले आहेत. त्यांचे वस्तुमान नेपच्यूनच्या वस्तुमानाच्या एवढे असावे, ते या मातृताऱ्याभोवती ६ ते ६०० दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतात. हे ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतरापेक्षा मातृताऱ्यापासून ०.०६ ते १.४ पट अंतरावर आहेत. या ग्रहांपैकी एक शनिसारखा असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ६५ पट आहे. तो मातृताऱ्याभोवतीच २२०० दिवसांत प्रदक्षिणा करतो. दुसरा एक ग्रह हा बाहय़ग्रह स्वरूपाचा असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १.४ पट आहे. तो मातृताऱ्याच्या खूप जवळ आहे. ते अंतर पृथ्वी व सूर्याच्या अंतराच्या २ टक्के आहे. त्या ग्रहावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १.१८ दिवसांइतका असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा