मंगळावरील चेसी प्लॅटिनिया (म्हणजे स्वर्णिम सपाट) च्या पश्चिम भागात २० जुल १९७५ रोजी व्हायकिंग १ लॅंडर उतरले होते. हा भाग मंगळाच्या सरासरी व्यासाच्या सुमारे २.७ किलोमीटर खाली आहे. ज्या भागात व्हायकिंग १ लँडर उतरले त्या भागाला नंतर थॉमस मच मेमोरियल स्टेशन असे नाव देण्यात आले. ते या मोहिमेचे प्रमुख होते.
गेल्या सदरात सांगितल्याप्रमाणे व्हायकिंग -१ लँडरने मंगळावर पाय ठेवल्याच्या २५ सेकंदानंतर मंगळाचे छायाचित्र घेण्यास सुरूवात केली. हे पॅनोरॅमिक छायाचित्र व्हायकिंगला पृथ्वीकडे पाठवायला चार मिनिटे लागली. हे चित्र रंगीत नव्हतं पण दुसरे दिवशी त्याने मंगळाचे पहिले रंगीत छायाचित्र पाठवले. या छायाचित्रात मंगळाचा हा पृष्ठभाग अगदी पृथ्वीसारखाच दिसत होता. इतका की पहिल्यांदा बघताना हे पृथ्वीवरीलच एखाद्या जागेचे चित्र असावे असे वाटावे.
लँडर उतरल्यानंतर त्यातील एक एक यंत्रणा हळू हळू सुरू करण्यात आली. मंगळावर भूकंपांचे मापन घेणारे यंत्र आपल्या जागेवरून बाहेर येत नव्हतं. त्याला बाहेर काढणारा जो यांत्रिक हात होता त्याला तो प्रवासात हलू नये म्हणून जखडून ठेवण्यासाठी लावलेली त्याची पिन अडकली होती. मग या हाताला झटका देऊन ही पिन सोडवण्याचा प्रयोग करण्यात आला. सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर ही पिन निघाली आणि हे यंत्र बाहेर काढण्यात यश आले.
मंगळाच्या पृष्ठभागावरून अभ्यास करण्यासाठी जी उपकरणे पाठवण्यात आली होती त्या सर्व प्रथम म्हणजे दोन कॅमेरे होते जे विविध दिशांची छायाचित्र आपल्याला पाठवत होते. मंगळावर कधीकाळी सजीव होते का? मंगळाच्या मातीत चयापचय क्रिया होऊ शकते का याचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळे प्रयोग करण्यात आले होते. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर वातावरणाचा दाब, तापमान, वायूचा वेग, मंगळावर चुंबकीय क्षेत्राची मोज घेणारी अशी अनेक यंत्र होती.
मंगळाच्या मातीचे विश्लेषणातून ही माती साधारण पृथ्वीवर आढळते तशी ज्वालारसासारखी होती. या मातीत फार मोठ्या प्रमाणात सिलिका आणि लोह यांची मात्रा होती पण त्याचबरोबर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सल्फर, कॅशियम आणि टिटॅनियम असल्याचे दिसून आले. या मातीतील पोटॅशियमचे प्रमाण पृथ्वीच्या तुलनेत एक पंचंमांश होते. तर पृष्ठ भागावरून घेतलेल्या मातीच्या काही नमुन्यात सल्फर आणि क्लोरीनचे प्रमाण पृथ्वीवर समुद्र किनाऱ्यावर बाष्पीभवन झाल्यानंतर मिळणाऱ्या वाळूत असते तेवढे होते, तर पृष्ठभागाच्या खालच्या भागामधून घेतलेल्या नमुन्यात सल्फरच प्रमाण कमी होतं. याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी असं मत व्यक्त केलं होत की इतर नमुन्यात सल्फर कदाचित इतर मुलद्रव्याच्या, संयुगाच्या स्वरूपात – म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम किंवा लोह संयुगाच्या स्वरूपात असेल. याची पुष्टी नंतरच्या मोहिमांमधून झाली.
मंगळाच्या मातीच्या नमुन्यांच्या निरिक्षणांचे परीक्षण आणि इतर अभ्यासानंतर असा अंदाज करण्यात आला की, एकूण मातीचे स्वरूप ज्वालासार मातीत सारखे आहे ज्यात ९० टक्के लोह मिश्रित चिकणमातीच आहे तर १० टक्के मॅग्नेशियम सल्फेट, ५ टक्के कॅल्शियम आणि ५ टक्के लोहाचे ऑक्साईड.
मातीच्या नमुन्यांना तापवले पण ज्या प्रमाणे हे नमुने तापवण्यात आले त्यावरून या नमुन्यांमध्ये किती पाणी होत हे सांगण आवघड होतं. पण एका अंदाजा प्रमाणे सुमारे १ टक्का पाणी या नमुन्यांमध्ये असले पाहिजे. तर वजनाच्या सुमारे ३ ते ७ टक्के भागात चुंबकीय गुणधर्म असलेले खनिज होते.
व्हायकिंग-२ हे ३ सप्टेंबर १९७६ रोजी व्हायाकिंग १ च्या पश्चिमेस २०० कि.मी अंतरावर उतरले होते. व्हायकिंग-२ ने केलेल्या परीक्षणांचे निष्कर्ष व्हायकिंग-१ सारखेच होते. याच बरोबर महत्त्वाचा प्रयोग म्हणजे मंगळावर सजीव कधी होते का याचा शोध घेण्याचा होता. त्याची चर्चा आपण पुढच्या सदरात करूया. मंगळाच्या मातीत मेटाबॉलिझम किंवा चयापयचय ही क्रिया घडते का याच शोध घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या प्रयोगातून करण्यात आला होता. यातील दोन प्रयोगातील निष्कर्ष या मातीत सजीवांच्या अस्तित्वास नकार देणारे होते तर एका प्रयोगात उत्तर होकारार्थी मिळत होतं. पण त्यावरही इतर शास्त्रज्ञांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते.
त्या वेळेच्या मोहिमांबद्दल वाचताना व आज हे लिहिताना या मोहिमा आश्चर्यचकित करणाऱ्याच वाटतात. मंगळ आपल्याजवळ असताना सुद्धा किती दूर आहे याचा अंदाज प्रकाशाच्या गतीने मंगळावरून पृथ्वीवर येणाऱ्या संदेशांना आपल्यापर्यंत पोचायलाच मुळी १५ मिनिटे लागतात या वरून घेता येतो आणि इतक्या अंतरावरून एखादी यंत्रणा अचूक चालवणं किंवा त्यात काही बिघाड झाला तर तो दुरूस्त करणं म्हणजे काही साधी गोष्ट नक्कीच नाही.
मंगळावरच्या त्या वेळेच्या मोहिमांबद्दल वाचताना या मोहिमा आश्चर्यचकित करणाऱ्याच वाटतात. मंगळ आपल्याजवळ असताना सुद्धा किती दूर आहे याचा अंदाज प्रकाशाच्या गतीने मंगळावरून पृथ्वीवर येणाऱ्या संदेशांना आपल्यापर्यंत पोचायलाच मुळी १५ मिनिटे लागतात या वरून घेता येतो