आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन नाशिक शहर जनराज्य आघाडी व युवक आघाडीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी कळविले आहे.
पुढील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आघाडीचे कार्य तळागाळात नेण्याच्या दृष्टिने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे व जनतेचे प्रश्न सोडवावेत, या हेतूने दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. जनराज्य आघाडीने महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाले होते.
मालेगाव व सटाणा तालुक्यातही जनराज्य आघाडीचे बऱ्यापैकी बस्तान आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी स्वत:चा उमेदवार उभे करण्याविषयी सांगितले जात आहे. नाशिक शहर जनराज्य आघाडी आणि नाशिक शहर जनराज्य युवक आघाडी यांची नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येईल, असेही डॉ. हिरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
नाशिक शहर जनराज्य आघाडीची कार्यकारिणी बरखास्त
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन नाशिक शहर जनराज्य आघाडी व युवक आघाडीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी कळविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Working committee dissolved of nasik city janrajya front