पंकजाचा सानिकाला संपवण्याचा प्लॅन, तर सई मात्र…; ‘लय आवडतेस तू मला’मध्ये पुढे काय होणार?
कलर्स मराठीवरील 'लय आवडतेस तू मला' मालिकेत सध्या उत्कंठावर्धक वळण आलं आहे. कमलच्या अपहरणानंतर सानिका आणि तिच्या टीमने तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण अपहरणाचं खरं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पंकजा सानिकाला संपवण्याचा कट रचतेय, तर सई तिला थांबवण्याचा निर्धार करतेय. पुढील भागात सानिका सईला माफ करून संधी देणार आहे. पंकजा सानिकावर हल्ला करवते, पण सानिका आणि सरकार यांच्या स्मार्ट खेळीमुळे गुंडांना पळवून लावलं जातं. मालिकेचे पुढचे भाग अनेक धक्कादायक वळणं घेणार आहेत.