कामात यश ते भागीदारीत नफा; मेष ते मीनपैकी तुमच्या राशीचा कसा जाईल सोमवार? वाचा राशिभविष्य
24 March Panchang and Rashibhavishya: आज फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी मंगळवारी सकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी संपेल. आज दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत परिघ योग राहील. तर उत्तराषाढा नक्षत्र संपूर्ण दिवस असेल आणि मंगळवारी पहाटे ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. तसंच आज राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज उत्तराषाढा नक्षत्रात मेष ते मीनचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात…