अक्षय्य तृतीयेला २४ वर्षांनंतर अक्षय योग, ‘या’ तीन राशींना मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. याला अबुझ मुहूर्त असेही म्हणतात, म्हणजेच कोणताही शुभ काळ न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येते. यावेळी ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी ग्रहांचा विशेष योगायोगही घडत आहे. वैदिक पंचांगानुसार, २४ वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला अक्षय योग निर्माण होत आहे. यापूर्वी २००१ मध्ये असा योग निर्माण झाला होता. यावेळी चंद्रदेखील वृषभ राशीत गुरुशी युती करून गजकेसरी योग तयार करत आहे. यामुळे अक्षय्य तृतीयेला १२ पैकी ३ राशींना अक्षय योगाचा विशेष फायदा होणार आहे.