कुंभ राशीला नोकरी, व्यवसाय कधी होणार लाभ? आरोग्य ते नातेसंबंध… कसे असेल वर्ष; वाचा
कुंभ ही शनीची रास आहे. धीरोदात्तपणा , मुत्सद्दीपणा, जिद्द, चिकाटी हे शनीचे गुण कुंभ राशीत विशेषत्वाने दिसून येतात. आपल्या कुशाग्र बुद्धीला सिद्धीचा वरद हस्त आहे. अगम्य, असाध्य असे मिळवण्याची आपली इच्छा असते. ज्ञानलालसा, संशोधक वृत्ती आणि प्रामाणिकपणा हे आपले खास गुण आहेत. आपली आकलनशक्ती चांगली असते. कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडणे बुद्धिमत्तेच्या सहाययने आपणास शक्य होते. अशा कुंभ राशीला 2025 हे वर्ष कसे असेल ते पाहूया.