गजकेसरी राजयोगाने पालटणार ‘या’ राशींचे भाग्य, २९ एप्रिलपासून मिळणार भरपूर आर्थिक लाभ
Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग सर्वात शुभ मानला जातो. या राजयोगात जन्मलेली व्यक्ती भविष्यात राजासारखे जीवन जगते असे मानले जाते. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर पूर्ण मेहनत घेत मात करते आणि शेवटी यश मिळवत आनंदी, समृद्धदायी जीवन जगते. यात हा राजयोग धनाचा कारक ग्रह गुरु आणि मनाचा कारक ग्रह चंद्र यांच्या संयोगातून तयार होत आहे. यात चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होऊन शुभ, अशुभ योग तयार होत असतात.