मिथुन राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? वाचा वर्षाचे राशीभविष्य
Gemini Annual Horoscope 2025 : मिथुन ही बुधाची रास आहे. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. नुसती हुशारी नाही तर व्यवहारज्ञान आणि चुणचुणीतपणादेखील बुध देतो. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये या छटा स्पष्ट दिसतात. नर्म विनोद, काव्य-शास्त्र या विषयांची आपणास मूलतः ओढ असते. काहीसा मिश्कीलपणा आणि चौकस बुद्धी ही आपली खरी ओळख आहे. एखादी गोष्ट बघताना, ऐकताना आपल्याला प्रश्न पडले नाहीत किंवा मनात शंका आल्या नाहीत तरच नवल! अशा या मिथुन राशीला २०२५ हे नववर्ष कसे असेल हे पाहूया.