२४ तासानंतर गुरु मार्गी होताच पलटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब
Guru Margi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह ज्ञान, समृद्धी, ज्योतिष, शिक्षण आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरुच्या हालचालीच्या बदलाने सर्व क्षेत्रांवर विशेष परिणाम दिसून येतो. यात गुरु ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी वृषभ राशीत वक्री झाला आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्गी झाला, म्हणजे सरळ चाल केली; यामुळे काही राशींचे नशीब आता पालटू शकते. या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नेमकं कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ…