Hanuman Jayanti: हनुमानाची आरती आणि मारुती स्त्रोत्र! वाचा मारुतीरायाची पूजा कशी केली जाते
Hanuman Aarti and Maruti Strotra in Marathi: शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती शनिवारी १२ एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. हनुमान जयंती म्हणजे पवनपुत्र मानल्या जाणाऱ्या हनुमानाचा जन्मदिवस. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. अनेक भक्तगण या जन्मोत्सवादिवशी आनंदात, मोठ्या श्रद्धेत हा दिवस साजरा करतात. यानिमित्ताने आज श्री हनुमानाची आरती आणि मारुती स्त्रोत्र याबरोबरच हनुमंताची पूजा कशी केली जाते त्याबद्दल जाणून घेऊ या…