लग्नासाठी पत्रिकेतील ३६ पैकी किती गुण जुळणे आवश्यक? ज्योतिषी काय सांगतात
विवाह हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र बंधनांपैकी एक मानला जातो. पण, पती-पत्नीचे वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानाचे जावे यासाठी लग्नाआधी दोघांची कुंडली जुळते का हे पाहिले जाते. मुला-मुलीने एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांच्या घरचे आधी जन्मपत्रिका आणि कुंडली पाहतात. कारण हिंदू धर्मात असे मानले जाते की, लग्नानंतर दोन व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात, ज्यामुळे भविष्यातील समस्या टाळता येतात. या कारणास्तव कुंडली जुळवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.