२७ फेब्रुवारीला लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, एकाग्रता, बौद्धिक क्षमतेचा कारक ग्रह मानला जातो; तर शुक्र हा आनंद, समृद्धी, प्रेम, आकर्षण, आदर, विलासिता यांचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत या दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर निश्चितच कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. अशात राक्षसांचा गुरू शुक्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. तसेच, फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रहदेखील या राशीत प्रवेश करील. दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे.