वर्षाच्या शेवटी शनी-शुक्राचा संयोग! ‘या’ राशींच्या आयुष्यात सुरू होणार संकटांची मालिका!
ज्योतिषशास्त्रानुसार, ९ ग्रह ठराविक काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाला गोचर किंवा परिवर्तन असे म्हणतात, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असतो. दानवांचा स्वामी शुक्र ग्रह दर २६ दिवसांनी राशी बदलतो. यावेळी एका किंवा दुसऱ्या ग्रहाशी त्याचा संयोग होतो. यात २०२४ वर्षाच्या शेवटी शुक्राचा शनी देवाबरोबर संयोग होणार आहे. शनी-शुक्राच्या संयोगामुळे १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव नक्कीच पडेल.