१६४ वर्षांनंतर शुक्र-नेप्च्यूनचा प्रभावी योग; प्रमोशनसह भौतिक सुख मिळणार
शुक्र-वरुण युती 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, वरुण ग्रहाने 19 फेब्रुवारी 2023 रोजी मीन राशीत प्रवेश केला असून 27 जून 2025 पर्यंत तिथेच असेल. शुक्र ग्रहही मीन राशीत असल्याने 'माया' योग निर्माण झाला आहे. या योगाचा शुभ प्रभाव मिथुन, कन्या आणि तूळ राशींवर होईल. या राशींना आर्थिक, वैवाहिक, आणि व्यावसायिक यश मिळेल, तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.