budhaditya rajyog 2024 | rajyog in horoscope astrology
1 / 30

१७ नोव्हेंबरनंतर बुधादित्य राजयोगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे उत्पन्न होणार दुप्पट वाढ!

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशिबदल करीत असतो. अनेकदा दोन ग्रहांच्या एका राशीतील परिवर्तनामुळे राजयोग तयार होतो; ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यात ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुधाने २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला. त्यानंतर आता १७ नोव्हेंबरला ग्रहांचा राजा म्हटला जाणारा सूर्यदेवाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे, या दोन ग्रहांच्या एकाच राशीतील संयोगामुळे आता बुधादित्य राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

Swipe up for next shorts
sharad pawar narendra modi maharashtra cidhan sabha election 2024
2 / 30

शरद पवार व नरेंद्र मोदींची लग्नरास एकच; दोघांमध्ये साम्य काय? काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय साम्य व फरकांवर ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांना आगामी काळात यश व प्रसिद्धी मिळेल, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे. पवार आणि मोदी यांच्यात राजकीय शत्रूंवर मात करण्याचं कसब आहे. दोघांची लग्नरास वृश्चिक असल्यामुळे काही बाबतीत साम्य आहे. मात्र, मतदारराजाचा कौलच त्यांच्या भविष्याचा निर्णय करेल.

Swipe up for next shorts
Sharad pawar on ajit pawar
3 / 30

“नाद करायचा नाय….”, पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना शरद पवारांचा इशारा; भर सभेत म्हणाले…

शरद पवार : निवडणूक प्रचारासाठी आज अंतिम रविवार. विविध पक्षातील नेत्यांकडून आक्रमक भाषणं केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना इशारा दिला. २०२३ मध्ये पक्षात फूट पडली होती. १९८० सालीही त्यांनी अशाच अनुभवाचा सामना केला होता. तेव्हा सोडून गेलेल्या आमदारांचा पराभव केला होता. "सगळ्यांचा नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही," असं समर्थकांनी म्हटलं.

Swipe up for next shorts
rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
4 / 30

वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!

लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. जे. पी. नड्डा यांच्या विधानामुळे ही दरी वाढली. महाराष्ट्रात अजित पवारांना सत्तेत घेतल्यामुळे आरएसएसने नाराजी व्यक्त केली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आरएसएसची मदत घेतल्यामुळे ही दरी निवडणुकीपुरती मिटल्याचं दिसतं. आरएसएसचे स्वयंसेवक भाजपा महायुतीसाठी प्रचार करत आहेत.

Amit Shah Rally cancle
5 / 30

अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, कारण काय?

मणिपूरमध्ये पुन्हा उसळलेल्या हिंसाचारामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराच्या सभा रद्द केल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, गडचिरोली आणि वर्धा येथे त्यांच्या सभा होणार होत्या. मणिपूरमध्ये तीन महिला आणि तीन मुलांच्या हत्येनंतर परिस्थिती चिघळली आहे. अमित शाह यांच्या जागी शिवराज सिंग चौहान आणि स्मृती इराणी या ठिकाणी सभा घेणार आहेत.

Congress Complete Candidate List in Marathi
6 / 30

राष्ट्रीय पक्षांचा राज्यात तंटा, महाराष्ट्रात ‘इतक्या’ ठिकाणी काँग्रेस भाजपाला थेट भिडणार!

महाराष्ट्रात जागावाटपात जरी काँग्रेसनं शंभरीपार मजल मारली असली, तरी त्यातल्या जवळपास ७७ जागांवर काँग्रेस भाजपाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचवेळी समोरच्या बाजूनेही काँग्रेसशी थेट लढतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची असली, तरी २८८ पैकी तब्बल ७७ जागांवर दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
7 / 30

“राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका करत म्हटलं की, भाजपाने राजकारणाचा विचका केला आहे. महाराष्ट्राने काय करायचं ते ठरवलं असून २३ नोव्हेंबरला ते समजेल. त्यांनी अजित पवार आणि मिंधे यांच्या बंडखोरीबद्दलही भाष्य केलं. राज ठाकरेंशी युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मोदी-शाह यांचं महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचं कारस्थान असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Supriya Sule on GOd
8 / 30

नवरात्रीचे नऊ दिवस उपवास अन् पांडुरंगांवर भाबडं प्रेम; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगावर असलेल्या त्यांच्या श्रद्धेबद्दल सांगितले. त्यांच्या आई आणि सासू मर्यादित श्रद्धाळू आहेत, पण सुप्रिया सुळे यांची पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे. त्यांनी जावयाचे पाय धुण्याच्या प्रथेवरही टीका केली आणि सुचवले की अधिक महिन्यात जोडप्याने आपल्या पालकांचे पाय धुवावेत. त्यांनी आपल्या श्रद्धा कोणावरही लादत नसल्याचेही स्पष्ट केले.

Nishigandha Wad
9 / 30

हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

Nishigandha Wad : मराठी, हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या निशिगंधा वाड यांच्याबाबत चिंताजनक वृत्त समोर आलं आहे. ‘सुमन इंदोरी’ या हिंदी मालिकेच्या सेटवर अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. यामुळे मालिकेतील इतर कलाकारांसह क्रूला धक्का बसला आहे. मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान निशिगंधा वाड घसरून पडल्या. त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तातडीने निशिगंधा वाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

How Was Supriya sule Marriage Fix
10 / 30

सुप्रिया सुळेंचं लग्न कसं जमलं? बाळासाहेब ठाकरेंसह माजी पंतप्रधांनांची कशी होती भूमिका?

सुप्रिया सुळे यांनी लल्लनटॉपशी बोलताना त्यांच्या लग्नाची कहाणी सांगितली. बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांच्या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावली. चंद्रशेखर यांनी सुप्रियाच्या आईच्या सांगण्यावरून सदानंद सुळे यांना फोन केला होता. सदानंद यांनी सुरुवातीला हा फोन मस्करी समजला. नंतर सुप्रियाने चंद्रशेखर यांची माफी मागितली. सुप्रिया सुळे यांनी राजकीय आणि वैयक्तिक नात्यांबद्दलही चर्चा केली.

Mitali Thackeray on womens public toilets
11 / 30

प्रचारादरम्यान मिताली ठाकरेंना काय जाणवलं? म्हणाल्या, “महिलांशी कनेक्ट झाल्यावर…”

मिताली ठाकरे माहीम मतदारसंघात प्रचार करताना महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीपासून मिताली त्यांच्या सोबत आहेत. प्रचारादरम्यान महिलांच्या शौचालयांच्या समस्यांवर त्यांनी विशेष लक्ष दिले. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि उपलब्धता याबाबत त्यांनी अनुभव शेअर केला. मितालींच्या मते, महिलांशी त्यांचा चांगला संवाद झाला आणि त्यांनी त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडल्या.

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
12 / 30

“निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; राज्यात काय घडणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर प्रचार करत आहेत आणि महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं भाकित केलं. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणुकीनंतर मोठे आश्चर्याचे धक्के बसतील असं विधान केलं. भाजपाला पाठिंबा देण्याचं कारण सांगताना त्यांनी शिवसेनेत असताना भाजपाशीच संबंध असल्याचं स्पष्ट केलं.

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 kartik aaryan starr movie lead over ajay devgn starr movie on third saturday
13 / 30

‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी ‘इतक्या’ कोटींची कमाई

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : २०२४मधील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ यांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू आहे. दिवाळीचं औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रुह बाबा आणि बाजीराव सिंघम यांच्यात बॉक्स ऑफिसवर चढाओढ पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ‘सिंघम अगेन’ आघाडीवर होता. पण आता ‘भूल भुलैया ३’च्या रुह बाबामुळे ‘सिंघम अगेन’ पिछाडीवर आहे.

manoj jarange patil health update
14 / 30

“मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे शरीर कधी जाईल…”, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान!

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे चर्चेत आले. त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, पण ऐनवेळी माघार घेतली. लासलगावमध्ये मराठा समाजाशी संवाद साधताना त्यांनी प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. "मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, शरीर साथ देत नाही," असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024
15 / 30

राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची कारणं; “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे महायुतीसोबत असूनही भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका करत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाची दोन कारणं दिली: सरकारबद्दलचा राग आणि मुसलमानांनी काँग्रेसला दिलेली एकगठ्ठा मतं. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट चुकीची असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
16 / 30

लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

अभिनेत्री रुपाली गांगुलीची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर एक मोठा अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचा जीव गेला आहे. या घटनेबाबत अजूनपर्यंत निर्मात्यांकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. पण पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
17 / 30

मुलांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी

मुलांना केवळ चांगले शिक्षणच नाही, तर चांगले संस्कारही महत्त्वाचे आहेत, कारण- हीच मुलं उद्याचं भविष्य असतात. त्यामुळे पालकांनी मुलांना लहान वयातच चांगल्या-वाईट गोष्टींची शिकवण दिली पाहिजे. त्यांचे चांगले संगोपन केले पाहिजे. कारण- जेव्हा ही मुलं मोठी होतात तेव्हा त्यांचं वागणं, बोलणं व संस्कार यावरून समाज त्यांना ओळखतो. त्यामुळे मुलं लहान वयात ज्या चुका करतात, त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. तीन वर्षांनंतर पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे ते जाणून घेऊ…

Kangana Ranuat in nagpur
18 / 30

“हिमाचलच्या कुशीत जन्म पण महाराष्ट्राने…” नागपुरातील सभा कंगना रणौत यांनी गाजवली!

कंगना रणौत नागपुरात: महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचारासाठी अनेक केंद्रीय नेते राज्यात आले आहेत. हिमाचलच्या खासदार कंगना रणौत यांनी नागपुरातील आर्वी विधानसभा मतदारसंघात सुमित वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्राने त्यांना ओळख दिली. त्यांनी महाविकास आघाडीला "महाअनाडी सरकार" म्हणत, धर्माचा विनाश आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला.

Sushma Andhare mimicry
19 / 30

“माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा अंधारेंनी केली अमृता फडणवीसांची नक्कल; म्हणाल्या…

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नक्कल केली. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे गटनेता बनले आणि भाजपाशी संगनमत करून गद्दारी केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

Raj Thackeray
20 / 30

“निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण केले. त्यांनी निवडणुकीचा काळ कंटाळवाणा असल्याचे म्हटले. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. विविध मतदारसंघांचे दौरे करताना प्रकृती बिघडल्याने काही ठिकाणी फक्त मतदारांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी मतदारांना मनसेला मतदान करण्याचे आवाहन केले.

Pankaja Munde in Pathardi
21 / 30

“९० हजार बुथसाठी भाजपाकडून ९० हजार माणसं, त्यामुळे ऑक्सिजन…”, पंकजा मुंडेंचं तुफान भाषण!

पंकजा मुंडे पाथर्डीत म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात असून भाजपाचे अनेक नेते राज्यभर फिरत आहेत. त्यांनी मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पाथर्डीत सभा घेतली. त्यांनी मतदारांना २० तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटण दाबून मोनिका राजळे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. राज्यात काय चाललंय हे बघायला संपूर्ण देश आलाय, असंही त्यांनी नमूद केलं.

Mallikarjun Kharge and JP Nadda
22 / 30

आचारसंहितेचं उल्लंघन! भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. भाजपाने राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती, तर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात तक्रार केली होती. दोन्ही पक्षांना १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तरे मागवली आहेत. महाराष्ट्रात २८८ आणि झारखंडमध्ये ३८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
23 / 30

नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?

देश-विदेश November 16, 2024

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये शुक्रवारी रात्री महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षदर्शी भगवान दास यांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.

aaditya thackeray on rss bjp maharashtra election
24 / 30

“मला RSS ला विचारायचंय की..”, आदित्य ठाकरेंचा सवाल; भाजपाच्या सत्तेतील वाट्याचं गणित…

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी आरएसएस व भाजपाला लक्ष्य केले. त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा आरोप केला आणि भाजपातील अंतर्गत संघर्षावर भाष्य केले. तसेच, भाजपातील आयात उमेदवारांना मिळालेल्या पदांवर प्रश्न उपस्थित केले.

Amitabh Bachchan shouted at R Balki
25 / 30

दिग्दर्शकाच्या पहिल्याच सिनेमाचा पहिलाच सीन, चिडलेले अमिताभ बच्चन सर्वांसमोर ओरडले अन्…

बॉलीवूड November 16, 2024

दिग्दर्शक आर. बाल्की यांनी आपल्या पदार्पणाच्या 'चीनी कम' चित्रपटात अमिताभ बच्चन यांना घेतलं होतं. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी अमिताभ बच्चन बाल्की यांच्यावर ओरडले होते. बाल्की यांनी रिटेकची विनंती केल्याने बच्चन चिडले होते. मात्र, नंतर बच्चन यांनी बाल्की यांना फोन करून चित्रपट समजल्याचं सांगितलं. 'चीनी कम' चित्रपट हिट ठरला आणि २००७ च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही प्रीमियर झाला.

priyanka Gandhi
26 / 30

बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं आव्हान

प्रियंका गांधी यांनी शिर्डीतून बोलताना महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्षावर भाष्य केले. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना दिलेलं आव्हान प्रियंका गांधी यांनी स्वीकारलं. त्यांनी मोदी-शाह यांना जातीय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा काढण्याचं आव्हान दिलं. त्यांनी सांगितलं की, विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला नसता.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
27 / 30

“मला जिराफ म्हटलं जायचं”, अभिनेत्री सोनाली बेंद्रेला एकेकाळी करावा लागला होता टीकेचा सामना

हेल्थ November 16, 2024

बिग स्क्रीनवर फिल्म्सच्या कमबॅकप्रमाणेच, अनेक जुन्या सेलिब्रिटींच्या मुलाखतीही सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा समोर येत असतात. अशीच एक अभिनेत्री सोनाली बेंद्रेची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये लोकप्रिय असण्याबद्दल वक्तव्य केले आहे. खरे तर ही लोकप्रियता नकारात्मक होती. अभिनेत्रीने तिच्या दिसण्यावरून तिला कशी टीका सहन करावी लागली होती याबद्दल तिने सांगितले.

NCP Ajit Pawar Candidates
28 / 30

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची यादी एका क्लिकवर, कोणाला कुठून उमेदवारी?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये फूट पडली. अजित पवारांनी भाजपाला समर्थन देत उपमुख्यमंत्री पद मिळवलं. महायुतीत भाजपाला १४६, शिंदे गटाला ८०, आणि अजित पवारांना ५१ जागा मिळाल्या. अजित पवारांच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने विधानसभेत अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. २३ तारखेला निकाल स्पष्ट होईल.

raja hindustani budget and box office collection
29 / 30

फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?

बॉलीवूड November 16, 2024

बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा 'राजा हिंदुस्तानी' चित्रपट २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. १९९६ साली आलेला हा रोमँटिक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. कमी बजेट असूनही, या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली होती. धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. करिश्मा कपूरला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींचा नकार मिळाला होता.

Aaditya Thackeray on his marriage
30 / 30

दोनाचे चार हात केव्हा होणार? आदित्य ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “याच कारणासाठी…”

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आदित्य ठाकरे जोरदार प्रचार करत आहेत. लोकसत्ता लोकसंवाद मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांच्या लग्नाविषयी मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी मनसेवर टीका करताना म्हटले की, मनसे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी नव्हे तर गुजरातच्या हितरक्षकांसाठी लढत आहे. शिवसेनेत फूट पडण्याचे कारण आमदारांचे आर्थिक स्वार्थ असल्याचेही त्यांनी सांगितले.