सूर्य-मंगळाच्या आशीर्वादाने १६ जानेवारीपासून ‘या’ राशींना मिळणार भरपूर यश अन् पैसा
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे. त्याच्या राशिबदलाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडत असतो. दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ हादेखील एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल निश्चितच १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून १८० अंशांवर असतील; ज्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे.